नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार मेकर कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सेलेरियो या कारचे डिझेल व्हर्जन बुधवारी सादर करण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नव्या डिझेल कारचे इंजिन या कॅटेगरीतील सर्वात लहान व खूपच किफायतशीर आहे. हे इंजिन खुद्द मारुतीने फिएट कंपनीसोबत मिळून तयार केले आहे.
कंपनीने दावा केला आहे की, ही नवी कार 27.62 किमी प्रतिलीटर मायलेज देईल. कंपनीचा दावा खरा मानला तर सेलेरियो डिझेल आता भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त मायलेज देणारी कार म्हणून स्विफ्ट डिझायर डिझेलचे नाव घेतले जाते जिचे मायलेज 26.59km/l आहे. कंपनीने या कारची चार मॉडेल्स आणली आहेत. ज्यांची किंमत 4.65 लाख रूपये पासून ते 5.71 लाख रुपये (एक्स शोरूम प्राईस, दिल्ली) दरम्यान आहे.
काय आहे खास
- 4 वॅरिएंट
- LDi (4.65 लाख)
- VDi (4.95 लाख)
- ZDi (5.25 लाख)
- ZDi (OPT) (5.71 लाख)
- इंजिन 793 सीसी टि्वन-सिलेंडर आहे, जे 47 बीएचपी पॉवर जेनरेट करते.
- की-लेस एंट्री, स्टियरिंगवर ऑडियो कंट्रोल, टेम्परेचर डिस्प्ले यासारखी फीचर्स
- 900 कोटी रूपये खर्च केले आहेत मारूतीने हे इंजिन डेव्हलप करण्यासाठी
- 89 किलो वजनाचे इंजिन आहे हे, देशातील सर्वात हलके इंजिन.
- डिझिटल क्लॉक, फ्रंट आणि रियर पावर विंडो
- सेंट्रल लॉकिंग, ड्रायवर आणि को ड्रायवर एयरबॅग्स, एबीएस वुईथ ईबीडी
- इलेक्ट्रिकली एडजस्टेबल आउटसाइड रियर व्यू मिरर
- रियर वायपर आणि डिफॉगर, ऑडियो वुईथ ब्लूटूथ
- अलॉय व्हील्स, हाईट एडजस्टेबल ड्रायवर सीट
- कलर्स- सनशाइन ग्रे, ब्लेजिंग रेड, सेरुलियन ब्लू, पर्ल आर्कटिक व्हाईट, सिल्की सिल्वर, ग्लिस्टनिंग ग्रे
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेलेरियो डिझेल कारचे फोटोज...