आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीच्या नफ्यात 12 टक्के घट; गुंतवणुकदारांना शेअर डिव्हिडंड देणार कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या वतीने आकडेवारी जाहीर करण्यात आली असून कंपनीचा नफा १२८४ कोटींवरून घसरून ११३४ कोटी रुपयांवर आला आहे, तर कंपनीचे उत्पन्न १२.५ टक्क्यांच्या वाढीसह १४,९२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनीच्या वतीने आपल्या गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी ३५ रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे.

चौथ्या तिमाहीमध्ये मारुतीचा सेल ३.६ लाख युनिटचा झाला आहे, तर सुमारे २७ हजार युनिटची निर्यात झाली आहे. कंपनीच्या मते गुजरातमधील आरक्षणाचे आंदोलन तसेच जाहिरातीसाठी होणाऱ्या खर्चात वाढ केल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आरक्षण आंदोलनामुळे १० हजार युनिटचे नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. जाहिरातीचा खर्च वाढवल्यामुळे कंपनीच्या इतर खर्चाची भागीदारी १५ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी इतर खर्च एकूण १३ टक्के होता. तसेच या दरम्यान कंपनीचे इतर उत्पन्न ३२० कोटींवरून १२१ कोटी रुपये झाले आहे.