आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki S Cross Launch In The August Prelaunch Booking Started

मारुतीची पहिली प्रीमियम कार S-CROSS ची बुकिंग सुरु, ऑगस्टमध्ये लॉन्चिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मारुती सुझुकीची क्रॉसओव्हर कार S-CROSS)
नवी दिल्ली- मारुती सुझुकी कंपनीची पहिली प्रीमियम कार क्रॉसओव्हर S-CROSSची बुकिंग बुधवारी सुरु झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही कार बाजारात येणार आहे. या कारची किंमत 8 ते 12 लाख रुपयांच्या रेंजमध्ये आहे. 25 हजार रुपयांत ही कार बुक करता येणार आहे.

डिझाइन...
S-Cross चे केबिन आणि इंटीरियर Swift सारखेच आहे. मारुतीची ही कार क्रॉसओव्हर यूरोपियन S-Cross albeit च्या धर्तीवर बनवण्यात आले आहे.

कारचे वैशिष्ट्ये...
उंच ग्राउंड क्लिअरन्स
डीआरएलसोबत जिनॉन प्रोजेक्टर
फॉक्स स्किड प्लेट्स
डॅशबोर्ड आणि डूर पॅनलमध्ये सॉफ्ट टच प्लास्टिकचा वापर
फ्रंट आणि बॅक सीट आरामदेह आणि स्पेसियस
अॅडजेस्टेबल ड्रायव्हिंग सीट
टिल्ट स्टीअरिंग.
टॉप टू व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅंप्स, वायपर्स आणि पुश स्टार्ट बटण.

सेंटर कन्सोलचे वैशिष्ट्य...
7 इंचाचा स्मार्टप्ले इन्फोटेन्मेंट.
ऑडिओ, नेव्हिगेशन, रिअर कॅमेरा आणि ब्लुटूथ सारख्या सुविधा
चार भागात विभाजीत होणारा स्क्रीन
ड्राइव्हर स्टिअरिंगवर बसवलेल्या स्विचने संपूर्ण सिस्टम कंट्रोल करता येईल.
तसेच व्हाइस कमांडनेही सिस्टम कंट्रोल करता येईल.

इंजिन
एस क्रॉस फक्त डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
1.6 लिटर आणि 1.3 लिटर इंजिन.
6 स्पीड गिअरबॉक्स.
सेफ्टी
8 ट्रिम्समध्ये उपलब्ध होईल.
सर्व मॉडेल्समध्ये एअरबॅग आणि एबीएस सिस्टम
205 मिलिमीटर साइजचे डिस्क ब्रेक

'NEXA'शोरूममध्ये उपलब्ध होईल कार...
S-CROSS या कारची डिलिव्हरी मारुती सुझुकीच्या जेनरेशन नेक्स्ट शोरूम 'नेक्सा'मधून होणार आहे. पुढील आठवड्यात देशातील 30 शहरांमध्ये 'नेक्सा'चे शोरूम सुरु केले जाणार आहेत मार्च, 2016 पर्यंत देशभरात नेक्साचे 100 शोरूम सुरु करण्याची कंपनीचा मानस आहे. पहिल्यांदा S-CROSS कारची बुकिंग नेक्सामध्ये होत आहे. भविष्यात मारुती सुझुकीच्या प्रीमिअम कारची डिलिव्हरी 'नेक्सा'मधूनच मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, S-Cross कारचा लूक...