आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची आवडती Swift होणार आकर्षक, 3 नवीन मॉडेल्स होणार लॉंच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडियाने २०१८ ऑटो एक्स्पोसाठी खास तयारी केली आहे. या दरम्यान कंपनी ऑल न्यू स्विफ्टचे नवीन मॉडेल्स सादर करणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत हे मॉडेल्स लॉंच केले जाणार आहेत. या शिवाय पेट्रोल आणि डिझेल व्हेरायंटच्या ऑटोमॅटिक व्हर्जनसह २०१८ मारुती स्विफ्ट स्पोर्टही सादर केली जाणार आहे. त्यानंतर हे व्हेरायंट भारतीय बाजारपेठेत विकले जाणार आहे.

 

एवढेच नव्हे तर मारुती काही काळापासून स्विफ्ट हायब्रिड हिचीही चाचणी घेत आहे. हे व्हेरायंट ऑटो एक्स्पोत सादर केले जाईल. दरम्यान, यासंदर्भात कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या कार सादर करण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातील काही मॉडेल्सचे टेस्टिंग भारतीय रस्त्यांवर घेण्यात आले आहे.

 

मारुती स्विफ्ट स्पोर्ट्स
सुरवातीला मारुती ही कंपनी स्विफ्टचे १.२ लीटर पेट्रोल आणि १.३ लीटर डिझेल व्हेरायंटला लॉंच करणार आहे. स्विफ्ट स्पोर्ट्सला काही कालावधीनंतर लॉंच केले जाणार आहे. नावावरुन लक्षात येते, की हे व्हेरायंट स्पोर्टी लुक आणि स्पोर्टी टेक्नॉलॉजीसह सादर केले जाणार आहे. कारअॅंडबाईक या वेबसाईटनुसार, या कारमध्ये १.४ लीटर टर्बोचार्ज्ड, ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. १४० पीएस पॉवर आणि २३० एनएम टॉर्क ते जनरेट करते. यात ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

 

कारचे डायमेन्शन
२०१८ सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट ३,८९० एमएम लांब, १७३५ एमए रुंद आणि १५०० एमएम उंच आहे. रेग्युलर स्विफ्टच्या तुलनेत ही ५० एमएम मोठी आहे. या कारला यापूर्वी जुलै २०१७ मध्ये फ्रेंकफर्ट मोटार शोमध्ये २०१७ मध्ये सादर करण्यात आले होते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, स्विफ्टच्या इतर दोन मॉडेल्सचे फिचर्स....  

बातम्या आणखी आहेत...