आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीच्या स्विफ्टपासून ‘डिझायर’ झाली वेगळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारुती सुझुकी ‘स्विफ्ट’ २ बॉक्स कार आहे. त्याला ३ बॉक्स कारमध्ये परिवर्तित करून कंपनीने २००८ मध्ये ‘स्विफ्ट डिझायर’ नावाने मॉडेल सादर केले होते. तेव्हापासून डिझायर हे मॉडेल स्विफ्ट श्रेणीतील होते. म्हणजे डिक्की (बूट) वाली स्विफ्ट. याशिवाय दोन्ही मॉडेलमध्ये फारसा फरक नव्हता.  

स्विफ्ट हॅचबॅक आहे. हॅचबॅक २ बॉक्स कार असते. यात एक बॉक्स इंजिनसाठी आणि दुसरा प्रवाशासाठी असतो. तशाच पद्धतीची सेडान ३ बॉक्स कार असते. यात एक बॉक्स इंजिनसाठी, एक प्रवाशासाठी तर तिसरा डिक्कीसारखा वापरता येतो. आता मारुतीने नवी डिझायर सादर केली आहे. त्याच्या नावातून स्विफ्ट शब्द वजा केला. डिझायरला सेडानचा फील देण्यासाठी याच्या मितींमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.  डिझायर आता वेगळी आणि अगदी नवी कार ठरेल. १६ मे रोजी भारतात उपलब्ध होणार आहे. डिझायरला संपूर्णतः सेडानमध्ये परिवर्तित करण्यासाठी मारुती सुझुकीने काय बदल केले ते पाहू...  

नव्या डिझायरला सेडानचा फील 
- न्यू प्लॅटफॉर्म ( सध्याच्या डिझायरपेक्षा वजन १०५ किलोग्रॅमने कमी) : नव्या डिझायरला मारुती सुझुकीद्वारे डिझाइन केलेल्या नव्या ‘हार्टेक्ट’ धर्तीवर तयार केले आहे. मारुतीची बलेनोदेखील याच धर्तीवर आहे. ही बनावट मजबूत असून वजन कमी आहे. सध्याच्या डिझायरपेक्षा नवी गाडी १०५ किलोग्रॅमने हलकी आहे. त्यामुळे कारची इंधन क्षमता आणि परफॉर्मन्स सुधारले आहे.  
 
- व्हीलबेस वाढवण्यात आला आणि उंची कमी केली : नव्या डिझायरचा व्हीलबेस सध्याच्या डिझायरपेक्षा वाढवला आहे. लेगरूमची जागा वाढवली आहे. याची उंची ४० एमएम कमी केली आहे. ग्राउंड क्लीअरन्सला ७ एमएम कमी केले आणि सेडानसारखा फील दिला आहे. शिवाय बूट स्पेस वाढवण्यात आले आहे. पूर्वी हे ३१६ लिटर होते आणि आता ३७६ लिटरचे आहे.  
 
- एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स (फर्स्ट इन सेगमेंट) : नव्या डिझायरमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. हे प्रथमच या श्रेणीत देण्यात आले. हे हेडलॅम्प्स डे-टाइम रनिंग लाइट्ससोबत असून कारला प्रीमियम लूक देतात.  
 
- ऑल न्यू इंटेरियर : कारचे एकूणच इंटेरियर बदलले आहे. डॅशबोर्ड नवा आहे. स्विफ्टसारखे यातही फ्लॅटबॉटम स्टिअरिंग व्हील आहे. सेंटर कन्सोलमध्ये ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. लेदर रॅप्ड स्टिअरिंग व्हील, वूडन ट्रीम, ड्यूएल टोन डॅशबोर्ड, रियर एसी व्हेंट्स, आर्म रेस्ट विद कप होल्डर्स इत्यादीमुळे प्रीमियम फील येतो.  
 
- डिझायरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये सेफ्टी फीचर्स : नव्या डिझायरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये एबीएस, ईबीडी, ड्यूएल एअरबॅग्ज आणि ISOFIX चाइल्ड सीट स्टँडर्ड आहे.
 
देण्यासाठी केलेले बदल  
मारुती सुझुकी डिझायर  
 किंमत : ~ ५.७-८.५ लाख (अंदाजे)
इंजिन : १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल, गिअरबॉक्स : ५ स्पीड मॅन्युअली आणि ५ स्पीड ऑटोमॅटिक ,  
शक्ती : ८३  बीएचपी (पेट्रोल), ७५ बीएचपी (डिझेल)
पेट्रोल इंजिनमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन असेल. सध्याच्या डिझायरमध्ये केवळ डिझेल इंजिनसोबत एएमटी होते. ऑल न्यू डिझायर मारुतीची फ्लॅटबॉटम स्टिअरिंग व्हील असलेली पहिली कार आहे. 
 इंजिन :  १.२ लिटर पेट्रोल आणि १.२ लिटर डिझेल 
 शक्ती : ८३ बीएचपी (पेट्रोल) , ७५ बीएचपी (डिझेल)
 गिअरबॉक्स : ४ स्पीड ऑटोमॅटिक (पेट्रोल) 
 ५ स्पीड मॅन्युअल (पेट्रोल आणि डिझेल दोन्हीतही) डिझेल कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स नाही.
 
बातम्या आणखी आहेत...