आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीमि‍यम कारसाठी मारुतीचे नवे शोरूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लहान आणि स्वस्त कार अशी ओळख असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने आता प्रीमियम कार विकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अशा महागड्या कार विक्रीमध्ये पाय रोवण्यासाठी नेक्सा ब्रँडअंतर्गत नव्या शोरूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. या शोरूममध्ये फक्त महागड्या कार विकण्यात येणार आहेत. याची सुरुवात आगामी एस-क्रॉस मॉडेलपासून होणार आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी आ. एस. कलसी यांनी सांगितले की, तीन दशकांत कंपनीने १.५ कोटी ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे. आता महागड्या गाड्या खरेदी करणा-या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन उत्पादने बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमचे जुने ग्राहक आमच्यासोबत कायम राहतील. चालू वर्षात मारुती सुझुकी इंडियाने जूनपर्यंत ३.४१ लाख कार विक्री केल्या आहेत. ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.८ टक्के जास्त आहे.

रोजगाराच्या संधी
कंपनीच्या वतीने देण्यात येणा-या विविध डीलरकडे हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन आणि फायनान्शियल सर्व्हिसेससारख्या क्षेत्रात ७०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना लक्झरी कार खरेदी करण्यासाठी सुविधा होईल.