नवी दिल्ली- 'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा'ने (एम&एम) गुरुवारी आपली स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेकल (एसयूव्ही) सेग्मेंटमधील नवी दमदार कार 'TUV 300' लॉन्च केली. TUV 300 ची किंमत 6.90 ते 9.12 लाख रुपये (पुणे एक्स शोरूम) आहे. कंपनीने TUV3OO एसयूव्ही डेव्हलप करण्यासाठी चार वर्षांत एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
18.49 kmpl चे मायलेज...महिंद्राने आपल्या नव्या कारमध्ये लोकप्रिय ठरलेली कार स्कॉर्पियोच्या क्षमतेचे इंजिन बसवले आहे. कारचे इंजिन 1500 CC चे आहे. नवी एसयूव्ही कारचे मायलेज 18.49 kmpl असेल, असा दावा कंपनीने केला आहे.
कोणासोबत स्पर्धा...TUV 300 ही कार मारुती सुझुकीची नुकतीच लॉन्च झालेली कार 'एस-क्रॉस' आणि ह्युंदाईची
'क्रेटा'ला टक्कर देण्याची शक्यता आहे.
व्हेरिएंट | किंमत |
T4 | 6.90 लाख रुपये |
T4+ | 7.25 लाख रुपये |
T6 | 7.55 लाख रुपये |
T6+ | 7.80 लाख रुपये |
T6+ AMT | 8.52 लाख रुपये |
T8 | 8.40 लाख रुपये |
T8+ AMT | 9.12 लाख रुपये |
खास फीचर्स
'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा'ची नवी एसयूव्ही TUV 300 अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत आहे. याता फ्लॅट रूफ, छोटे ओव्हरहॅगस, लार्ज विंडो आणि हाय ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आले आहे.
> महिंद्राची नवी TUV 300 मध्ये 1.5 mHawk इंजिन आहे.
> पॉवर 61.5 KW (84 hp)।
> मायलेज 18.49 kpml
> 230 Nm टार्क।
> 2WD सोबत 5 स्पीड ट्रान्समिशन
> 7 सीट
> ड्युअल एअरबॅग
पुढील स्लाइड्सवर पाहा नवी एसयूव्ही TUV 300च्या लॉन्चिंगचे फोटो...