आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेटार विक्रीचा वेग मंदावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्पादन प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी अनेक कंपन्यांनी घेतलेल्या ‘शटडाऊन’मुळे माेटार विक्रीच्या वाढीला ब्रेक लागला अाहे. जून महिन्यात माेटारींच्या विक्रीत केवळ १.५३ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. गेल्या पाच महिन्यांमधील सर्वात मंदावलेली ही विक्रीची कामगिरी अाहे. मारुती सुझुकी इंडिया, टाेयाेटा किर्लाेस्कर माेटार्स या अव्वल कंपन्यांच्या प्रकल्पातही वार्षिक देखभालीचे काम झाले. गेल्या अाठ महिन्यांमध्ये माेटारसायकलींच्या विक्रीत किंचितशी सुधारणा झाली अाहे.
माेटारींच्या विक्रीत हळूहळू वाढ हाेत असून गेल्या काही महिन्यांमध्ये ग्राहकांच्या मानसिकतेतही सुधारणा झाली अाहे. जानेवारीत माेटारींच्या विक्रीत ३.१४ टक्क्यांनी वाढ झाली हाेती, परंतु त्या तुलनेत जूनमध्ये मात्र फारशी वाढ झाली नसल्याचे ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.

मान्सूनच्या चिंतेमुळे तसेच व्याजाचे दर कमी हाेण्यासाठीची प्रतीक्षा यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदी लांबणीवर टाकली अाहे. त्यामुळे यंदाच्या एप्रिल ते जून या कालावधीत वाहन विक्री मंदावली असल्याचे मत वाहन उद्याेगातील कंपन्यांनी व्यक्त केले.

अवजड वाहनांची विक्री संमिश्र
मध्यम अाणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने काहीशी चांगली वाढ दाखवली असली, तरी हलक्या व्यावसायिक वाहनांमधील मरगळ अद्याप कायम अाहे. जूनमध्ये एकूण व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत संमिश्र कल दिसून अाला अाहे.

माेटारसायकल विक्रीवर ताण
ग्रामीण भागातून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने माेटारसायकलींच्या विक्रीवर ताण अाला अाहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माेटारसायकलींच्या विक्रीत सकारात्मक १९.३४ टक्क्यांनी वाढ झाली हाेती, असे माथूर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...