आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिऱ्याच्या चुऱ्याने रंगवलेली रोल्स रॉयस, रंग बनवण्यासाठी लागले दोन महिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनेव्हा -  या रोल्स रॉयस घोस्टवर छोटासा ओरखडा पडल्यावरही मोठा पश्चात्ताप होईल. या कारच्या बॉडीवर लावण्यात आलेल्या रंगामध्ये ‘डायमंड डस्ट’ म्हणजेच हिऱ्याचा चुरा मिसळण्यात आला आहे. हा सर्वात महागडा रंग असल्याचे जगजाहीरच असले तरी तो किती महागडा आहे, याविषयी कंपनीने माहिती दिलेली नाही. या कारची मूळ किंमतच सुमारे सहा कोटी रुपये आहे.
 
एका ग्राहकाच्या विशेष मागणीवर हा रंग बनवण्यात आला आहे. जिनेव्हामध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनात ही कार ठेवण्यात आली आहे. या हिऱ्याच्या रंगाला बनवण्यासाठी दोन महिने लागले. यासाठी हिऱ्याच्या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला. हिरा खूपच टणक असतो. त्यामुळे रंग दिल्यानंतर त्याला चिकना करणे सर्वाधिक अवघड काम होते. यासाठी हँड-पॉलिशच्या माध्यमातून लाखेचा थर देण्यात आला. आता हिऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी कोणतीही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नाही.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कारचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...