आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमदार बाइकमध्ये दोन नवे मॉडेल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेनेलीने सध्या पाच नव्या बाइक्ससह भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. या वर्षी दोन नव्या बेनेली बाइक्स बाजारात सादर होतील. यातील एक स्पोर्ट टूरिंग बाइक असेल. या बाइकला टीएनटी ११३० आर इंजिनच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. अ‍ॅमेझोन्स नावाने ती सादर होईल. यात ११३१ सीसी थ्री - सिलिंडर इंजिन आहे.ही मिड व लो रंेजवर चांगला रीस्पॉन्स देते. महामार्गावर रीलॅक्स क्रूजची दुप्पट मौज अनुभवण्यासाठी इंजिन नोड्स दिले आहेत. इंजिनच्या आजूबाजूला बिस्पोक ट्रेलीस फ्रेम दिली आहे. फ्यूएल टँकची क्षमता २१.५ लीटर आहे. याचे ग्राउंड क्लिअरन्स १७० एमएम आहे.

- खास भारतासाठी तयार केलेली दुसरी बाइक आहे टीएनटी २५. हेडलँप वा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरशिवाय या बाइकमध्ये टीएनटी ३०० पेक्षा अगदी वेगळे फीचर्स आहेत. यात २४९ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे. टीएनटी ३०० च्या तुलनेत नव्या बाइकचे वजन २५ किलो कमी आहे.वजनाने कमी असली तरी फीचर्स व स्टाइलच्या बाबतीत जास्त सरस आहे. या वर्षी या दोन्ही बाइक बाजारात उतरवल्या जातील.

- २०१६ मध्ये देखील कंपनी नव्या बाइक बाजारात उतरवेल. सध्या मोटरबाइक्सचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र ५ नव्या बाइक भारतीय बाजारात उतरवल्या जाणार आहेत. यातील दोन बाइक्स टीएनटी ३०० चे व्हेरियंट असतील. या दोन्ही बाइक्स जास्त स्पोर्टी असतील. टीएनटीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतरच कंपनीने नव्या बाइकचा विचार
केला आहे.
बातम्या आणखी आहेत...