आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 जुलैला लॉन्च होईल Hondaची नवी \'JAZZ\', मायलेज 27.3kmpl

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः Honda कंपनीची न्यू प्रीमियम हॅचबॅक कार Jazzचे नवे मॉडेल)

नवी दिल्ली- Honda India ने आपली न्यू प्रीमियम हॅचबॅक कार Jazz चे नवे मॉडेल आणले आहे. Honda Jazz ही न्यू कार 8 जुलैला लॉन्च करणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे. न्यू कारचे मायलेज प्रतिलिटर 27.3 किलोमीटर राहील, असा दावा कंपनीने केला आहे.

डिझेल मॉडेल
Honda ने यापूर्वी भारतातीय बाजारात Jazzचे पेट्रोल मॉडेल लॉन्च केले होते. परंतु, आता Jazzचे डिझेल मॉडेल लॉन्च होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील Honda च्या प्रकल्पात Jazz च्या निर्मिती केली जात आहे.

दमदार इंजिन
Hondaची न्यू Jazz कारमध्ये 1.5-litre i-DTEC डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 100PSची पॉवर आणि 200NM चा टॉर्क उत्पन्न करतो. यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. या सारखे फीचर्स अमेज, मोबिलो आणि न्‍यू सिटी सारख्या कारमध्येही आहेत.
न्यू Jazz मध्ये 1.2-litre i-VTEC पेट्रोल इंजिनमध्येही उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन 88PSची पॉवर आणि 109NM चा टॉर्क उत्पन्न करतो. यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, सर्वाधिक मायलेज देणारी कार Jazzचे फीचर्स...