आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टेव्हियासारखीच मात्र जास्त स्पोर्टियर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कोडा ऑक्टेव्हियाला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनी आता न्यू-जेन कार बाजारात उतरवणार आहे. स्कोडा ऑक्टेव्हिया आरएसच्या सादरीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. अद्याप तिची किंमत जाहीर झाली नाही. मात्र ३० लाखांपर्यंत या कारची किंमत असण्याची शक्यता आहे.

- स्कोडा ऑक्टेव्हियाच्या अत्याधुनिक मॉडेलला बाजारात उतरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कारचे एकून वजन १३६५ किलो आहे. लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे ४६५९, १८१४, १४६१ एमएम आहे. यात ४ सिलिंडर, १९८४ सीसी, टर्बो-इंजिन आहे. कंपनीच्या सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवी ऑक्टेव्हिया ३० एमएमने उंचीला कमी आहे. त्यामुळे मॉडेलमधील बदल खूप शार्प वाटतात. कंपनीच्या प्रत्येक आरएस मॉडेलमध्ये स्पॉयलरचा वापर झालाय. मात्र स्कोडाच्या आरएस मॉडेलमध्ये सर्वात छोटे स्पॉयलर लावण्यात आले आहे.

- डॅशबोर्डचा आणि सीटची रचना स्पोर्टियर आहे. सीट सुंदर टक-इन केले आहेत. ७ सेकंदांत कार ताशी १०० किलोमीटर वेगाने धावते. याचा सर्वाधिक वेग २४८ केपीएच आहे.

- प्रथमदर्शनीच कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत फारशी वेगळी वाटणार नाही. स्पोर्टियर आरएसमध्ये लावलेले चेसिस आणि सस्पेन्शन भारतातील मॉडेलचेच घेण्यात आले आहे. यातील इंजिन भारतात उपलब्ध ऑक्टेव्हिया कारसारखेच आहे. यात किंचितच फरक आहे. नव्या कारमधील इंजिनाचा आकार थोडा मोठा आहे.

- ही आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान स्कोडा असल्याचा दावा कंपनीने केलाय. नव्या कारचे काही फीचर्स अगदी नवे आहेत. पुढच्या बाजूला, ज्याला नोज म्हणतात त्यावर ब्लॅक ग्रिल आहे. एअर इनलेट्सचा आकार जुन्या मॉडेलपेक्षा मोठा आहे. एअर डॅम पूर्वीपेक्षा खोल आहे. इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम लाइट्स आहेत.

- आरएस बॅजच्या मदतीने लूकला परिपूर्ण करण्यात आले आहे. बॅज पुढे-मागे दोन्हीकडे आहेत. संपूर्ण कारमध्ये भरपूर आरएस लोगो लावण्यात आले आहेत. बाय-कलरव्हीलमध्ये तीन पर्याय आहेत- १७,१८ आणि १९ इंची. पसंतीनुसार निवड करता येते. मागच्या बाजूला लावलेल्या ब्लॅक डिफ्युजरमुळेही स्पोर्टियर लूकमध्ये भरच पडते. कारमध्ये लेदर कव्हर्ड व्हील, गिअरलीव्हर आणि हँडब्रेक हँडल आहेत.

- परफॉर्मन्सच्या बाबतीत ऑक्टेव्हिया आरएस सामान्य ऑक्टेव्हिया टीएसआयसारखीच आहे. लो आणि मीडियम ड्रायव्हिंगवरही वेग तसाच आहे.
बातम्या आणखी आहेत...