आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा कोटीच्या ‘एस-क्लास’सारखी अनुभूती देते 70 लाखांची ‘ई-क्लास’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्सिडीझ बेंझने देशात ऑल न्यू ‘सी-क्लास’ श्रेणी सादर केली होती तेव्हा तिला ‘बेबी एस’ नावानेही आेळखले जात. ही कार सी-क्लास मर्सिडीझ बेंझच्या पहिल्या ‘एस-क्लास’ कारशी साम्य असणारी असल्याने तिला हे नाव दिले गेले. याच्या २ वर्षांनंतर मर्सिडीझने ऑल न्यू ई-क्लास (लाँग व्हील बेस) कार सादर केली. हिला कंपनीने कोणतेही खास नाव दिले नव्हते. मात्र, कारतज्ज्ञ हीला ‘मिनी एस’ म्हणत आहेत. या कारचा केवळ बाह्य भाग नव्हे, तर आतला भागही एस-क्लासने प्रेरित आहे. लांबी एस-क्लासच्या तुलनेत केवळ ७ इंच कमी. सव्वा कोटीची एस- क्लास कार ७० लाखांत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला अाहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ई-क्लासचे नामांकन एप्रिलमध्ये न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड कार ऑफ द इयर’ पुरस्कारांच्या ‘वर्ल्ड लक्झरी कार’ श्रेणीसाठी झाले आहे. या श्रेणीत ई-क्लासच्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि व्हॉल्व्हो एस९०/ व्ही ९० आहे. वर्ष २०१५ मध्ये सी-क्लासला या पुरस्कार सोहळ्यात ‘वर्ल्ड कार ऑफ द इयर’ घोषित केले होते. वर्ल्ड लक्झरी कार ऑफ द इयर म्हणून निवड होण्यासाठी कोणते निकष असतात याविषयी जाणून घ्या...  
 
पाच वैशिष्ट्ये केवळ पहिल्या श्रेणीतच असून ते हटके आहेत  
पार्क पायलट : सव्वा कोटीची मर्सिडीझ बेंझ एस- क्लासमध्ये ऑटो पार्क असिस्ट फीचर आहे. ई-क्लासमध्ये कंपनीने पार्क असिस्टची सुधारित आवृत्ती ‘पार्क पायलट’ दिली आहे. एस-क्लासला पार्क करण्यासाठी गिअर शिफ्टिंग गरजेचे होते. ई-क्लासमध्ये कळ दाबताच गाडी आपोआप पार्क होते. स्टिअरिंग व्हील फिरवण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने पार्किंगमधून बाहेर काढता येते. डी-पार्क पायलटचा वापर केलाय. 
 
लाँग व्हील बेस, मेमरी पॅकेज  : लाँग व्हील बेस हे नवे वैशिष्ट्य आहे. रियर सीट्ससाठी मेमरी पॅकेज तुमच्या सिटिंग पोझिशनची नोंद ठेवते. हे फिचर नवे आहे. 
 
६४ रंगाचे अँबियंट लायटिंग : ई-क्लासची केबिन या श्रेणीतील सर्वात शांत केबिन आहे. अँबियंट लायटिंगसाठी ६४ रंगांचे पर्याय आहेत. 
 
स्टिअरिंग माउंटेड टचपॅड :  हे हटके वैशिष्ट्य आहे. एस-क्लास श्रेणीत यापूर्वी हे नव्हते. स्टिअरिंग व्हीलवर दोन्हीकडे टच कंट्रोल दिले असून सेंटिंग्ज करता येतात.  
 
रिक्लायनिंग रिअर सीट्स : ई-क्लासमध्ये रियर सीट्स रिक्लायनिंग आहे. या श्रेणीत प्रथमच हे वैशिष्ट्य दिले आहे. रियर सीटिंग व्यवस्था ए-स क्लाससारखी आहे. यासोबतच शोफर पॅकेज दिले आहे. मागे बसूनही फीचर्सवर नियंत्रण ठेवू शकता. साइड विंडोज, इलेक्ट्रिक सन ब्लाइंड्स, रियर ग्लास ब्लाइंड आणि सनरूफची उघड-झाप याद्वारे करता येते.  समोरच्या सीटला सेट करणेही शक्य आहे.   
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ऑडी ए-६ मध्ये ४ झोन एसी, ई-क्लासमध्ये ३ झोन, बीएमडब्ल्यू ५ सिरीज (५३० डी एम स्पोर्ट््स )... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...