आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एअरबस’ची ‘पॉप अप’ रस्त्यावर धावेल, हवेतही उडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा - कारसह ड्रोनची कल्पना तर जुनीच आहे. मात्र, विमान निर्मिती करणारी कंपनी एअरबसने आता जीनिव्हा मोटर प्रदर्शनामध्ये नवीन कल्पना  समोर आणली आहे. याला कार, ड्रोन आणि ट्रेन, ऑल-इन-वन असे म्हणता येईल. याला “पॉप अप’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये कारच ड्रोन आणि ड्रोन हेच कार आहे. कंपनीने याचा व्हिडिओ दाखवला असून यामध्ये कारलाच हायपर लूप रेल्वेगाडीत बसताना दाखवण्यात आले आहे. ही स्वयंचलित छोटी कार एका कॅप्सूल्सप्रमाणे आहे. इटलीतील ‘इटालडिझाइन’ संस्थेने या कारचे डिझाइन तयार केले आहे.   
 
- कारमधील प्रवासी भागाला ड्रोनच्या मदतीने उडवले जाऊ शकते. या कंपार्टमेंटला हायरप लूप रेल्वेगाडीतही बसवता येईल.    
 
- ही कार आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालते. या कल्पनेला सत्यात उतरण्यासाठी किती वेळ लागेल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.   
 
पुढील स्लाईडवर वाचा, सुरक्षा - व्होल्व्हो एक्ससी- ६० अनेकदा उलटल्यानंतरही सुस्थितीत, गती - फेरारीची आतापर्यंतची सर्वात वेगवान कार ‘८१२ सुपरफास्ट’... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...