आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ड इंडियाच्या चेन्नई प्लँटमधून निघाली १० लाखावी गाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- फोर्ड इंडियाने चेन्नई प्लँटमधून १० लाखावे वाहन आणि इंजिन सादर केले असून या प्लँटसाठी हा एक विक्रम आहे. फोर्ड इंडियाने १९९९ मध्ये भारतीय बाजारात व्यवसायाला सुरुवात केली असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक (उत्पादन, वाहन जोडणी आणि इंजिन, चेन्नई) बालासंुदरम राधाकृष्णन यांनी दिली.

चेन्नईपासूनच आम्ही "मेक इन इंडिया'ला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. येथे असेम्बल करण्यात आलेले १० लाखावे वाहन "फोर्ड इकोस्पोर्ट' आहे. हा प्रकल्प म्हणजे जागतिक उत्पादनाचे केंद्र असून त्याने नवा बेंचमार्क स्थापित केला आहे. येथे फक्त जागतिक गुणवत्ताच नाही, तर कार्बन उत्सर्जनदेखील कमी झाले असल्याचे ते म्हणाले. एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करून १६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये फोर्ड इकोस्पोर्ट, फोर्ड फिएस्टा आणि फोर्ड अँडेवर मॉडेलच्या गाड्या तयार होतात. या प्रकल्पात वर्षाकाठी २ लाख गाड्या तसेच ३.४ लाख इंजिन तयार होण्याची क्षमता अाहे.