आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सवॅगनने आणली पहिली स्वयंचलित ‘सेड्रिक’ कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा वाहन प्रदर्शन - Divya Marathi
जीनिव्हा वाहन प्रदर्शन
जगातील सर्वात मोठ्या कार निर्माता फोक्सवॅगन समूहाने जीनिव्हा वाहन प्रदर्शनादरम्यान आपली पहिली स्वयंचलित ‘सेड्रिक’ कन्सेप्ट कार आणली आहे. ही दिसण्यास केबल कारप्रमाणेच आहे. ही इलेक्ट्रिक कार असल्यामुळे इंजिन नसेल, त्यामुळे आतून ती एखाद्या खोलीप्रमाणे असेल. मध्यभागी खुली जागा असेल. यामध्ये एकमेकांकडे तोंड करून लोकांना बसता येईल.  
 
कारमध्ये असतील खरी रोपे
ताज्या हवेसाठी ‘सेड्रिक’ मध्ये हवा शुद्ध करणारी रोपे लावलेली असतील. ही रोपे हवा येणाऱ्या खिडकीजवळ लावलेली असतील. विंडशील्डमधील तळ कॉम्प्युटर डिस्प्लेप्रमाणे काम करेल. यावर नकाशा आणि इतर माहिती दिसेल. ही कार आवाजी आदेशावर चालेल तसेच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातूनही कार चालवता येईल.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...