आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

44 वर्षांनंतर ‘जावा’ भारतीय रस्त्यांवरही धावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१८च्या अखेरीस भारतात सादर होणार - Divya Marathi
२०१८च्या अखेरीस भारतात सादर होणार
देशात प्रथम जावा मोटरसायकल १९६० मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हा कर्नाटकच्या म्हैसूर शहरात आयडियल जावा (इंडिया) लिमिटेडने याला चेकोस्लाव्हाकियाची कंपनी ‘जावा मोटर्सकडून’ परवाना घेऊन उत्पादित केले. याची सुरुवात १९२९ मध्ये झाली होती. भारतात जावाची निर्मिती १४ वर्षे झाली. १९७४ नंतर कंपनी आणि मॉडेल दोन्ही बदलले. ‘येजदी’ नावाने ती नव्याने आली. १९९६ मध्ये कंपनी बंद पडली. भारतात या दुचाकीचे उत्पादन १४ वर्षेच झाले असले तरीही या काळात जावाने ग्राहकांची मने जिंकली होती. ७० ते ८० च्या दशकापर्यंत ही मोटारसायकल रॉयल एनफिल्डची प्रमुख स्पर्धक होती. युरोपात तर आजही हिचा दबदबा कायम आहे. ही गाडी आजही तेथे प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच झेक रिपब्लिकमध्ये ‘ऑल न्यू जावा’ सादर झाली आहे. पूर्वी ही बाइक २ स्ट्रोक इंजिनसोबत येत होती. आता ४ स्ट्रोक इंजिनची आहे. नव्या जावामध्ये रेट्रो फिल अद्याप ठेवला आहे. जावाचा रेट्रो लुक हे त्याच्या लोकप्रियतेचे महत्वाचे कारण ठरले होते. ७० च्या दशकातील हा रेट्रो लुक नव्या जावाच्या विक्रिस देखील वाढवेल असा कंपनीचा दावा आहे. 

गेल्या वर्षी महिंद्रा अँड महिंद्राची सहायक कंपनी क्लासिक लेजेंड््स प्रायव्हेट लिमिटेडने जावासोबत एक्सक्लुझिव्ह लायसन्स अॅग्रिमेंट केले होते. तेव्हा या अॅग्रिमेंटनुसार जावा ब्रँड अंतर्गत बनणारे नवे प्रॉडक्ट्स भारतीय बाजारातदेखील सादर होतील असे ठरले. या उत्पादनांची महिंद्रा अँड महिंद्राच्या पिथमपूर (मध्य प्रदेश) प्रकल्पात निर्मिती करण्यात येईल. भारतीय बाजारात जावाची उत्पादने २०१८ पर्यंत सादर होतील. झेेक रिपब्लिकमध्ये ही उत्पादने सादर झाली आहेत. जावाचे नवे मॉडेल आता  भारतीय बाजारात सादर होण्याची बाईकच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. २०१८च्या अखेरीस ही मोटारसायकल भारतातदेखील उपलब्ध होईल. या मोटारसायकलच्या वैशिष्ट्यांविषयी...
 
जावा ३५० आेएचसी
- इंजिन : ३९७ सीसी एअर  कूल्ड , १ सिलिंडर ४ स्ट्रोक
- शक्ती : २७.३५ बीएचपी
- गिअरबॉक्स : ५ स्पीड
-कमाल वेग : १३० किमी / ताशी
- मायलेज : ३३.३ किमी / लिटर
- इंधन टाकी : १२ लिटर
 
 
बातम्या आणखी आहेत...