आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा क्यू ५०१ एसयूव्ही डिझाइनवर लँड रोव्हर डिस्कव्हरी मॉडेलचा प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क-  भारतीय कार कंपनी टाटा मोटर्सची नवी कार चाचणीदरम्यान रस्त्यावर दिसली. डिझाइनबाबतीत ती लँड रोव्हर डिस्कव्हरी मॉडेलची कॉपी वाटते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही कार २०१८ मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध होईल. चाचणीदरम्यान या कारला क्यू ५०१ हे सांकेतिक नाव दिले आहे. कारच्या लाँचिंगबाबत अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा झाली नाही; पण हे मॉडेल २०१८ च्या ऑटो एक्स्पोत लोकांसमोर येईल आणि वर्षअखेरीस विक्रीसाठी बाजारात येईल, असे मानले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हे सफारीचे आगामी मॉडेल असू शकते. नवा लूक मिळाल्याने ही एसयूव्ही ग्लोबल एसयूव्हीसारखी दिसेल. मजबुतीबाबत बोलायचे तर टाटाने ती लँड रोव्हर प्लॅटफॉर्ममध्ये तयार केली आहे. ते ब्रिटनमधील प्रख्यात नाव आहे.

- क्यू ५०१ मध्ये टाटाचे नव्हे, तर फियाटचे इंजिन लावले आहे. टाटा आणि फियाट यांच्यात झालेल्या करारादरम्यान ते भारतीय प्रकल्पात तयार केले आहे.  
- त्याच्या इंटेरिअरबाबत अद्याप कुठलीही विशेष माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.  
- त्यात काही भाग जेएलआर (जॅग्वार लँड रोव्हर) प्लॅटफॉर्मचे आहेत. टाटा मोटार्स पहिल्यांदा आपल्या एखाद्या गाडीत अशा प्रकारचा प्रयोग करत आहे.  
- टाटाची ही एसयूव्ही दोन व्हॅरिएंटमध्ये पाहायला मिळू शकते. क्यू ५०१ पाचआसनी असेल तर क्यू ५०२ सात आसनी (ऑप्शनल) असू शकते. त्यामुळे मोठे कुटुंबही सहज बसू शकेल.  
- कोणत्याही रस्त्यावर क्यू ५०१ ने चांगला परफॉर्मन्स द्यावा म्हणून कंपनीने ती डिझाइन करताना बरीच काळजी घेतली आहे. उदा. वॉटर वाडिंग कपॅसिटी आणि ग्राउंड क्लिअरन्स हाय ठेवले आहे.  
- असे मानले जात आहे की टाटा क्यू ५०१ ला मॅन्युअल २ डब्ल्यूडी (२ व्हील ड्राइव्ह) आणि एडब्ल्यूडी (ऑल व्हील ड्राइव्ह) ट्रान्समिशन सिस्टिममध्ये लाँच करू शकते. 
- टाटा सफारी पहिल्यांदा १९९८ मध्ये लाँच करण्यात आली होती. 
बातम्या आणखी आहेत...