बेंटले या ब्रिटिश कार उत्पादक कंपनीने डिट्रॉयट ऑटो शोच्या खंडीय शृंखलेत नवी काँटिनेंटल सुपरस्पोर्ट्स कार सादर केली. बेंटले सुपरस्पोर्ट््स मॉडेलचे तिसरे व्हर्जन असलेली ही आतापर्यंतची सर्वात वेगवान चार प्रवासी बसू शकेल अशी कार मानली जाते. कंपनीने १९२० मध्ये सर्वप्रथम, तर २००९ मध्ये त्याचे नवे मॉडेल आणले होते. कूपे आणि कन्व्हर्टेबल अशा दोन्ही प्रकारांत ही उपलब्ध असून शक्ती आणि वेगाच्या बाबतीत लॅम्बोर्गिनी आणि फेरारीच्या काही मॉडेलपेक्षा वरचढ आहे.
- यात ऑल न्यू ६.० लिटरचे ट्विटन टर्बो डब्ल्यू १२ इंजिन असून त्यातून ७०० एचपी ऊर्जा तसेच १०१७ एनएम टॉर्क मिळते.
- याचे कूपे मॉडेल ताशी ०-१०० किमीचा वेग केवळ ३.५ सेकंदांत, तर कन्व्हर्टेबल मॉडेल ३.९ सेकंदांतच धरतो.
- कमाल ताशी ३३६ किमी वेगाने धावू शकते.
= वजन २.४ टन असून सध्याच्या काँटिनेंटल जीटी आणि २००९ मध्ये आलेल्या सुपरस्पोर्ट्सपेक्षा वजनाने हलकी आहे. अन्य समतुल्य कारच्या तुलनेत वजन अपेक्षेने थोडे जास्त आहे.
- या कारमध्ये नवे टॉर्क कन्व्हर्टर सिस्टिम असून ऊर्जा योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी ते सहायक ठरते.
- ऊर्जा पुरवठ्यासाठी यात ऑल-व्हील- ड्राइव्ह सिस्टिम असून ते ६० टक्के ऊर्जा मागच्या चाकांना थेट पुरवण्यास सक्षम आहे.
- यातील रिअर स्पॉयलर, कूपर व्हॅरियंटसाठी फ्रंट स्पप्लिटर कॉम्बिनेशन, नवे सुपरस्पोर्ट््स बँजिंग, २१ इंची काळ्या रंगाचे नवे अलॉय व्हील तसेच साइड डिकेल्स ग्राहक त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात.
किंमत : ~२.९ लाख डॉलर
(भारतातील किंमत सध्या निश्चित नाही.)
अन्य स्पोर्ट्स कारच्या तुलनेत वजन जास्त अाहे. ही दोन दरवाजांची कार असून कुटुंबीयांच्या सोईच्या दृष्टीने तिची रचना करण्यात आली आहे. यात एअरकूलिंग सिस्टिमही बसवली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा,काँटिनेंटल जीटीप्रमाणे तीन रंगांचे मिश्रण असलेली केबिन .....