आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती सुझुकीच्या वार्षिक नफ्यात 36 % वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीतील नफा १५.८ टक्क्यांनी वाढून १७०९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला १,४७६.२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केल्यास कंपनीला विक्रमी ७,५११ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीला ५,४९७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. क्रेझला एसयूव्ही आणि बलेनो हॅचबॅकसारख्या प्रीमियम मॉडेलमुळे कंपनीला विक्रमी नफा झाला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी मारुतीने पाच रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या प्रत्येक शेअरवर ७५ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. शेअरधारकांना लाभांश दिल्यामुळे कंपनीवर करांसह २,७२६ कोटी रुपयांचा भार येईल. या आधीचे आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये कंपनीला प्रति शेअर ३५ रुपयांचा लाभांश दिला होता. नोटाबंदीमुळे कंपनीला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले. याचा खूप खराब परिणाम होणार असल्याचे सर्वांना वाटत होते.  मात्र, तसे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त पर्यावरणासंदर्भातही काही अडचणींचा सामना करावा लागला. विविध संस्थांच्या कामाच्या पद्धतीमुळे ऑटोमोबाइल कंपन्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. कमोडिटीतील तेजी, विदेशी चलनाच्या किमतीचाही परिणाम झाला.
बातम्या आणखी आहेत...