जापानी कार निर्माता Nissan ने भारतीय मारुती कंपनीला टक्कर देण्याची तयारी केली आहे. कंपनी Datsun ब्रॅंडच्या धर्तीवर सगळ्यात स्वस्त कॅम्पॅक्ट कार 'Redi Go' लवकरच सादर करणार आहे. या कारची भारतीय बाजारात 2.5 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता आहे.
'सीएमएफ-ए' प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली कार
रेनो-निसान अलायन्स असलेल्या 'सीएमएफ-ए' प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे. बॉडी डिझाइन 'Datsun Redi Go' कंसेप्ट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात ही कार मारुती अल्टो तसेच ह्युंदाईच्या कारसोबत स्पर्धा करेल.
भारतात निर्मिती...
Nissan Datsun प्रमाणे Redi Go कारची निर्मिती देखील भारतात होणार आहे. लोकल पार्टस आणि कंपोनेंट्स वापरण्यात आल्याने या कारची किंमत कमी असेल. रेनो-निसान अलायन्सच्या चेन्नई येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये या कारची निर्मिती होईल, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
कधी दाखल होईल बाजारात?
भारतीय बाजारात ही कार पुढील 18 महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या कारच्या टेस्टिंगचे काम सुरु आहे. कंपनीने या कारचे डिझाइन नुकतेच सादर केले होते.
कारची किंमत...
>बेसिक मॉडेल 4 हजार डॉलर्स अर्थात जवळपास 2.5 लाख रुपये
>टॉप मॉडेल 5 हजार डॉलर्स अर्थात जवळपास 3 लाख रुपये
पुढील स्लाइडवर पाहा Datsun Redi Go कारचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स...