आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्तास डिझेल नॅनो नाही, टाटाचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नॅनोच्या डिझेल मॉडेलसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टाटा मोटर्सने नॅनोचे डिझेल इंजिन तयार करण्याचा विचार तूर्तास लांबणीवर टाकला आहे. डिझेल मॉडेलसाठी काही प्रमाणात अडचणी येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी लवकरच झेन एक्स नॅनो सादर करणार आहे. यासाठी २ सिलिंडर युक्त ८०० सीसीचे डिझेल इंजिन विकसित करण्यात आले आहे. या इंजिनात थोडेफार बदल करून ते डिझेल नॅनोसाठी वापरण्यात येणार होते. मात्र, कंपनीने काही काळासाठी हे टाळले आहे.

टाटा मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी सांगितले, नॅनोसाठी डिझेल इंजिनात काही बदल करणे आवश्यक आहे. सध्या करण्यात आलेले बदल भारतीय ग्राहक स्वीकारणार नाहीत. याशिवाय सध्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीत जो फरक आहे, त्या हिशेबाने हे कंपनी आणि ग्राहक या दोघांसाठी महागडे पडणार आहे. यासाठी निश्चित किमतीत कार तयार करणे अवघड आहे.