आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती आता दरवर्षी देणार २१०० युवकांना प्रशिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कुशल कामगारांच्या पेचप्रसंगावर मात करण्यासाठी वाहन क्षेत्रातील अग्रणी मारुती सुझुकी इंडियाने अाता पुढाकार घेतला अाहे. कंपनीने काैशल्य विकासाला चालना देण्यासाठी वाहन काैशल्य विकास केंद्र सुरू करण्याची याेजना अाखली अाहे. सरकारी अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ‘अायटीअाय’ सुविधा असलेल्या देशभरातील जवळपास ४५ शहरांमध्ये ही केंद्रे स्थापन करण्यात येणार अाहेत.

या केंद्रांतून वर्षाला २,१०० युवकांना काैशल्य विकासाचे धडे देण्यात येणार अाहेत. असे कंपनीच्या सेवा विभागाचे संचालक पंकज नरुला यांनी या माेहीमेचा उद्देश विषद करताना स्पष्ट केले.

प्रशिक्षण काेणते : माेटार सेवा अाणि दुरुस्ती

प्रशिक्षणाचे स्वरूप
प्रत्यक्ष शिक्षण देण्यासाठी सुसज्ज माॅडेल वर्कशाॅप, पूर्णवेळ प्रशिक्षकाची िनयुक्ती, अावश्यक अवजारे अाणि साधनसामग्री उपलब्ध करून देणार, अायटीअाय विद्यार्थ्यांमध्ये काैशल्य विकास वाढीसाठी मारुती सुझुकी सेवा कार्यशाळेबराेबर भागीदारी

पाच काेटी रुपये खर्च करणार
कंपनी सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून मारुती सुझुकी या उपक्रमासाठी पाच काेटी रुपये खर्च करणार अाहे.