आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान बंधुंनी भंगारातून साकारली Jeep, स्टेअरिंग मारुतीचे तर इंजिन टेम्पोचे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- 'मेक इन इंडिया' या संकल्पनेला देशात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मग हरियाणातील रोहतकमधील खान बंधु तरी त्याला कसे अपवाद राहाणार. खान बंधुंनी भंगारातून स्पेअर्स गोळा करून चक्क जीप साकारली आहे. जीपला मारुती 800 चे स्टेअरिंग तर इंजिन टेम्पोचे बसवले आहे.


खान बंधुंच्या 'ड्रीम जीप'मध्ये चार प्रवाशी सहज बसू शकतात. ही जीपची सहा फूट लांब तर तीन फूट रुंद आहे. विशेष म्हणजे ही जीप एक लिटर डिझेलमध्ये 35 किलोमीटरचा मायलेज देते. सलमुद्दीन आणि समसू खान या दोघांनी बनवलेल्या जीपला ‘मेड इन इंडिया’असे नाव दिले आहे.
सलमुद्दीन आणि समसू खान हे दोघे दिल्ली रोडवर फेब्रीकेशनचे दुकान आहे. आपलीही स्वत:ची जीप असावी, असे दोघांना नेहमी वाटत होते. त्यामुळे दोघांनी स्वत:च जीप बनवण्याचा निर्धार केला. आपल्या दुकानाच्या एका भागात वर्कशॉप सुरु केले. जीपसाठी भंगार बाजारातून स्पेअर्स शोधून काढले. जीपची बॉडी स्वत:च तयार केली. यासाठी इंटरनेटचीही मदत घेतली. फेब्रीकेशनच्या कामातून फुरसत काढून टप्प्या टप्प्याने जीप उभी केली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, जीपला बसवले टेम्पोचे इंजिन तर मारुतीचे स्टेअरिंग...
बातम्या आणखी आहेत...