आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी बनवली एयरोडायनॅमिक कार, 60kmpl मायलेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला शेजारील देश पाकिस्तानात केवळ दहशतवादच फोफावतो आहे, असा सगळ्यांचा समज आहे. मात्र, पाकिस्तानातील लोकांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आता हेच पाहा ना, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी एक एयरोडायनॅमिक कार (Aerodynamic Car) साकारली आहे. RUSH असे या मॉडेलचे नाव आहे.

साहिवाल येथील COMSATS इंजीनियरिंग कॉलेजच्या आठ विद्यार्थ्यांच्या टीमने ही कार साकारली आहे. विशेष म्हणजे कारचे सर्व पार्ट्‍स देखील विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. मॅकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंटच्या टीमने फायनल ईयर प्रोजेक्ट म्हणून डॉ. जहीरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली कार डिझाइन केली आहे. डिझायनर टीमचे सदस्य ताहिर अली याने सांगितले की, कारच्या निर्मितीसाठी जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च करण्‍यात आली आहे. विद्यार्थ्यांनीच रुपये खर्च केले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, RUSH मध्ये काय आहे खास...