आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popular Cars That Will Get Expensive After FM Announced Infra Cess While Presenting Union Budget 2016 17

1 लाखापर्यंत महागणार कार; जाणून घ्या, देशातील 10 पॉप्युलर कारच्या किमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प- 2016-17 मध्ये ऑटो इंडस्‍ट्रीसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. या घोषणांसोबत सर्व करपात्र सेवांवर 0.5 उपकर लावण्यात आला आहे. या उपकराला कृषिकल्याण उपकर असे म्हणण्यात आले आहे. हा उपकर येत्या एक जूनपासून लागू करण्‍यात येणार आहे. परिणामी लहान कार व स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी व्‍हेकल (SUV) 4 टक्क्यांनी महागणार आहे. कारच्या किमतीत 3 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील प्रदूषण आणि वाहतुकीच्या समस्येवर तोडगा म्हणून अर्थमंत्र्यांनी प्रदुषण उपकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पेट्रोल, एलपीजी व सीएनजीवर चालणार्‍या लहान कारवर एक टक्का तर विविष्ट क्षमतेच्या डिझेल कारवर अडीच टक्के आणि त्याहून अधिक क्षमेतच्या कारवर व एसयुव्ही कारवर पाच टक्के प्रदुषण उपकर लावण्यात येणार आहे. यामुळे अर्थातच सर्व वाहने महाग होणार आहे.
कोणत्या कारवर किती सेस?
- पेट्रोल, एलपीजी, सीएनजी कार, ज्यांची लांबी 4 म‍िटर पेक्षा जास्त नाही, इंजिन क्षमता 1200 सीसी पेक्षा कमी आहे. अशा कारवर एक टक्का इंफ्रास्‍ट्रक्‍चर सेस उपकर लावण्यात येणार आहे.
- 4 मीटर पेक्षा लांब डिझेल कार, ज्यांची इंजिन क्षमता 1500 सीसी पेक्षा कमी अाहे. त्यांच्यावर 2.5 टक्के उपकर लावण्यात येणार आहे.
- सेडान, मल्‍टी पर्पस व्‍हेकल व एसयूव्ही कार, ज्यांची इं‍जिन क्षमता जास्त आहे. त्यांच्यावर 4 टक्के उपकर लावण्यात येणार आहे.

कि‍ती महाग होऊ कार...

लहान कारवर परिणाम:

> मारुती ऑल्‍टो के 10 (सीएनजी) किंमत 3.7 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली) आहे. जर एक टक्का उपकर लावण्यात आला तर या कारच्या किमतीत 3 ते 4 हजार रुपयांनी वाढ होऊ शकते.

प्रीमि‍यम कॉम्‍पॅक्‍ट कारवर परिणाम:
>मारुती सुझुकी बलेनोची किंमत 5.11 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली) आहे. जर 2.5 टक्के उपकर लावण्यात आला तर या कारची किंमत 13 हजार रुपयांनी वाढेल.

एसयूव्ही व सेडान कारवर परिणाम:
>महिंद्रा बोलेरोची किंमत 7.99 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली) आहे. जर 4 टक्के उपकर लावण्यात आला तर या कारची किंमत 30 ते 32 हजार रुपयांनी वाढेल. याशिवाय सेडान कार होंडा सि‍टीच्या किमतीत 32 हजार रुपयांपर्यंत वाढ होईल.

मारुती ऑल्‍टो
> 3 ते 4 हजार रूपयांनी महागणार

स्पेसिफिकेशन्स...
इंजिनः 796 सीसी
पॉवरः 67 Bhp
टॉर्कः 69 Nm
मायलेजः 20.2 KMPL
किंमतः 3.06 ते 3.81 लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली)