आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ग्राहकांसाठी बँकांनीही कर्ज स्वस्त करावे, हे अधिक महत्त्वाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार बाजारात ४७ % भागीदारी असणाऱ्या मारुतीने सप्टेंबरमध्ये ३१ टक्के वाढ नोंदवली आहे. यामुळे गेल्या महिन्यातील मारुतीची भागीदारी ४९.२ टक्के झाली आहे. कंपनीने २०२० पर्यंत वार्षिक विक्री २० लाखपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याच दृष्टीने कंपनी उत्पादन तसेच नेटवर्क वाढवत आहे. नवीन उत्पादने देखील आणत आहे. कंपनीचे ईडी (मार्केटिंग अँड सेल्स) आर. एस. कलसी यांनी दैनिक “दिव्य मराठी’ नेटवर्कशी केलेल्या विशेष चर्चेदरम्यान ही माहिती दिली आहे. या चर्चेचा सारांश..

- रिझर्व्ह बँकेने मंगळवारी रेपो दरात ०.२५ % कपात केली, ऑटो उद्योगाला यामुळे किती फायदा होईल, असे तुम्हाला वाटते?
हे आपल्या आर्थिक स्थितीचे द्योतक आहे. महागाई नियंत्रणात असल्याचा विश्वास रिझर्व्ह बँकेला आहे. आता बँकांनीही याचा फायदा ग्राहकांना देणे जास्त महत्त्वाचे आहे.

- जर बँकांनी ०.१५% कर्ज स्वस्त केल्यास तुमच्या विक्रीवर किती परिणाम होईल?
याचा सरळ संबंध नाही. बँकांनी ०.२५% व्याज कमी केल्यास एक लाख रुपयांच्या कर्जाच्या ईएमआयमध्ये फक्त १२ रुपये कमी होतील. त्यामुळे सध्यातरी व्याजदराच्या कपातीने विक्री वाढेल, असे म्हणता येणार नाही. मात्र, यामुळे ग्राहकांची धारणा मजबूत होईल.

- सप्टेंबरमध्ये मारुतीची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली. मात्र, कॉम्पॅक्ट सेगमेंटची वाढ फक्त १२ टक्क्यांच्या जवळपास आहे. ग्राहक इतर सेगमेंटकडे शिफ्ट झाले आहेत काय?
फक्त एकाच महिन्याच्या अाकडेवारीवरून कोणताच निष्कर्ष काढू शकत नाही. गेल्या वर्षी दसरा आणि दिवाळी वेगवेगळ्या महिन्यात होते. या वर्षी सर्व सण एकाच महिन्यात आहेत. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांतच आमची वाढ १२.१ टक्के झाली. ३१ टक्के वाढ जास्त कालावधीतील वाढ दाखवत नाही. या वर्षी आम्ही दोनअंकी वाढीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सेगमेंटचा विचार केल्यास बलेनो आणि ब्रेझासाठी ग्राहक प्रतीक्षेत आहेत. आम्हाला ताळमेळ साधावा लागतो. ज्या मॉडेलच्या गाड्या मागणीप्रमाणे उपलब्ध आहेत, त्यांचे उत्पादन कमी करून वेटिंग असणाऱ्या गाड्यांचे उत्पादन वाढवत आहोत.

- बलेनोवर सध्या किमती वेटिंग चालू आहे?
सुमारे आठ महिन्यांची. आम्ही उत्पादन ८,००० वरून वाढवून १०,००० केले आहे. त्यात आणखी वाढ करत आहोत. गुजरातमधील प्रकल्पात उत्पादन सुरू झाल्यास परिणाम होईल.

- तेथे कधीपासून उत्पादन सुरू होईल? किती क्षमता असेल?
जानेवारीमध्ये आमची ट्रायल सुरू होईल. पूर्ण उत्पादन पुढील आर्थिक वर्षात सुरू होईल. सुरुवातीला या प्रकल्पाची वार्षिक क्षमता २.५ लाख असेल. याला वाढवून ७.५ लाख करण्यात येईल. सुरुवात बलेनोपासून होईल. त्यानंतर इतरही मॉडेल बनवले जातील.

- काही दिवसांपूर्वी आपण जपानमध्ये बलेनोची निर्यात सुरू केली होती, तेथील मागणी कशी आहे?
जपानमधील मागणी चांगली आहे. विविध देशांमध्ये आतापर्यंत आम्ही ३०,००० बलेनो निर्यात केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात १९,००० बलेनो निर्यात झाल्या आहेत. भारतीय बाजारात एक लाखापेक्षा जास्त गाड्यांची विक्री झाली.

- बलेनोव्यतिरिक्त आणखी कोणते मॉडेल आणत आहात का, ज्याची भारतात डिझाइन झालेली आहे?
मार्चपर्यंत दोन मॉडेल येतील. इग्निस आणि बलेनो आरएस, काही मॉडेलवर सध्या काम सुरू आहे.

- हायब्रीड आणि इलेक्ट्रिकमध्ये तुमची काय योजना आहे?
हायब्रीडमध्ये दोन मॉडेल आणले आहेत - सियाझ आणि एर्टिगा. आणखी काही मॉडेल्स वर काम सुरू आहे. त्याची दिनांक अद्याप निश्चित झालेली नाही. इलेक्ट्रिक कारमध्ये सध्यातरी आम्ही आरअँडडी पातळीवर आहाेत. तंत्रज्ञानावर काम
होत आहे.

- गेल्या वर्षी आपण सुमारे १५ लाख गाड्या विक्री केल्या, या वर्षी किती गाड्यांच्या विक्रीची अपेक्षा आहे?
निर्यातीची भागीदारी तर देशाच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे. भारतीय बाजारात आम्ही १३ लाख कार विक्री केल्या होत्या. या वर्षी दोन अंकी विकासासाठी १४.३ लाख गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र, सर्व बाजारावर अवलंबून आहे. जीएसटी दरावरदेखील शेवटच्या तिमाहीतील विक्री अवलंबून असेल.

- दहा वर्षांत ऑटो क्षेत्रात ६.५ कोटी नवीन रोजगार निर्मितीचा सरकारचा अंदाज आहे. मारुतीकडून कितीची अपेक्षा करावी?
प्रवासी कारमध्ये आमची ४७% भागीदारी असल्याने रोजगारातही जवळपास तेवढीच असेल. निश्चित आकडा सांगणे अवघड आहे, कारण कंपनीच्या व्यतिरिक्त डीलरशिप, पुरवठा यासारख्या जागेवर रोजगार मिळतील. सध्या डीलरशिप आणि पुरवठादार मिळून सुमारे दोन लाख लोक आहेत. मारुतीची स्वत:ची मॅनपॉवर १४ हजारांच्या जवळपास आहे.

- नेक्साने आतापर्यंत किती डीलरशिप दिली आहे, या वर्षी आणखी किती नवीन सुरू होतील?
सुमारे १७ आऊटलेट सुरू झाले आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत हा अाकडा २५० पर्यंत जाईल. त्या वेळी पूर्ण देशात नेक्सा असेल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आणखी डीलरशिप सुरू होतील.

- युज्ड कार बिझनेसची किती भागीदारी आहे?
युज्ड कारचे आमचे १,००० पेक्षा जास्त आऊटलेट (ट्रू व्हॅल्यू) आहेत. आमची एकूण एक तृतीयांश विक्री आहे. ३४ टक्के भागीदारी एक्स्चेंजची आहे.

- टाटा मोटर्सने किमती वाढवणार असल्याचे म्हटले आहे, तुम्हीही असा विचार करत आहात का?
सध्या नाही. वास्तविक कमोडिटींचे दर वाढत आहेत. स्टील आणि रबर महाग झाले आहेत. रुपयाच्या तुलनेत येन मजबूत झाल्यानेही थोडा फरक पडला आहे. मात्र, गुंतवणूक थोडीफार वाढली तरी आम्ही त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. जास्त ओझे वाढले तरच किमती वाढवतो.

- जीएसटीमुळे कारच्या किमतीवर किती फरक पडेल?
जीएसटी परिषद किती दर ठेवेल यावर किमती अवलंबून असतील. सध्या तरी कारच्या किमतीत शुल्काची जास्त भागीदारी असते. एक्साइज, सीएसटी, व्हॅट आणि विविध प्रकारचे सेस मिळून हे सुमारे ३७% पर्यंत जाते.

आर. एस. कलसी,
ईडी (मार्केटिंग अँड सेल्स), मारुती सुझुकी
बातम्या आणखी आहेत...