आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारसाठी अनिवार्य होईल रियर सेंस, वेग नियंत्रणासाठी कंपन्‍यांना द्यावी लागेल वार्निंग सिस्‍टम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रस्ता सुरक्षेसाठी शासन लवकरच एक नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. कारसाठी रियर व्‍ह्यू सेंसर्स, स्पीड वॉर्निंग सिस्टम आणि एयरबॅग्स लवकरच अनिवार्य करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी कोणतीही अशी टाइमलाइन ठरवली नाही. मात्र, ऑक्‍टोंबर 2018 पासून सर्व चार चाकी वाहनांना ऑटोमेटेड इन्सपेक्शन सुरू केले जाणार आहे. असे असतील नवीन उपाय..
- एका वृत्‍तसंस्‍थेच्‍या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अभय दामले यांनी शुक्रवारी नवीन रस्‍ते सुरक्षा मेजर्स आणि नोटिफिकेशनबाबत माहिती दिली.
- दामले म्‍हणाले, “फिटनेस सर्टिफिकेशन मेंडेटरी करण्‍यात येईल आणि यामध्‍ये कोणी व्‍यक्‍ती
दखल देऊ शकणार नाही.”
आणखी नवीन काय होईल?
- दामले यांच्‍या मतानुसार, “सध्‍या चार चाकी वाहनांना जे रियर व्‍ह्यू मिरर लावण्‍यात येतात त्‍यामध्‍ये लहान मुले किंवा जमिनीवरील लहान वस्‍तू ठीक दिसत नाहीत. त्‍यामुळे रियर व्‍ह्यू सेंसर्स किंवा बॅकअप कॅमरा अनिवार्य करण्‍यात येईल.”
- वर्ल्ड रोड मीट 2017 च्‍या कर्टेन रेजरमध्‍ये दामले म्‍हणाले - भारतात दरवर्षी सुमारे 50 हजार जीवघेणे अपघात होतात. या प्रश्‍नावर तोडगा काढण्‍यासाठी शासन ऑडियो वॉर्निंग सिस्टमलाही अनिवार्य करणार आहे. सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टमप्रमाणे ते काम करेल.
- ड्रायव्‍हिंग लायसंस टेस्टही आता ऑटोमेटेड होणार आहे. दामले म्‍हणाले, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोटार वाहन (सुधारणा) विधेयक आणण्‍यात येईल. यामध्‍ये अपघाताला बळी ठरलेल्‍यांच्‍या मदतीबाबतही तरतुदी असणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...