किंमत: ३-४ लाख रुपये
सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. मल्टिपल ग्लोवबॉक्स आहे. डिजिटल स्पीडो लावले आहेत. यांचा आकार मोठा असून वाचणे सहज शक्य आहे.
> रेनोने नव्या कारला युनिक क्रॉसआेव्हर डिझाइन केले आहे. हे निराळे व आकर्षकही आहे.
> यात ८०० सीसी, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन लावले आहे. क्विडचे वजन केवळ ६७० किलो आहे.
> रेनोची क्विड या दिवाळीत सादर होईल. कारच्या फक्त पुढच्या बाजूला पॉवर विंडो कन्सेप्ट आहे.
> क्रॉसआेव्हर डिझाइन, अपक्लास फीचर आणि वाजवी किंमत असल्याने रेनोच्या या मिनी डस्टरची वाट ग्राहक पाहत आहेत. या दिवाळीपर्यंत ही कार रस्त्यावर धावताना दिसेल. क्विड सादर करून रेनो हॅचबॅक श्रेणीत क्रॉसआेव्हर अपील घेऊन येत आहे.
> फ्रेंच कंपनी रेनोने क्विडचे डिझाइन आणि फीचर्स खूप बारकाईने डिझाइन केले आहेत. कार चाहत्यांना नक्कीच ही कार स्वत:कडे खेचून घेईल हे निश्चित. या कारद्वारे रेनो भारतात हक्काचा ग्राहकवर्ग निर्माण करेल. मारुती, ह्युंदाईला तीव्र स्पर्धा निर्माण करणारी ही कार ठरेल.
> चेन्नईमध्ये क्विडला सादर करण्यात आले होते. प्रथमदर्शनीच यातील हाय बोनेट, हाय वेस्टलाइन आणि १८० एमएमचे हाय ग्राउंड क्लीअरन्स ग्राहकांच्या पसंतीला उतरले. क्रॉसआेव्हर श्रेणीतील ही आकर्षक कार ठरेल.
> क्विडचा पुढचा भाग रेनोच्या ट्रेडमार्क डिझाइनसारखाच आहे. पुढच्या बाजूला मॅट ग्रिल लावले आहे. यात टू-एलिमेंट हेडलाइट आहेत. ३डी लूक देण्यात आलाय. डस्टरप्रमाणेच फोगला अपर इनलेट्समध्ये फिट करण्यात आले आहे.
> कारला जवळून पाहिल्यावर कमी किमतीतील कारची वैशिष्ट्ये लक्षात येतात. केवळ एक वायपर आहे. आतल्या बाजूचा आरसा अॅटजेस्टेबल नाही. चाकाला केवळ ३ लॉकिंग नट्स आहेत. दरवाजाचे हँडल पूल टाइप नाही.
> क्विडची इंडियन क्रॅश टेस्ट नॉर्म्सची पूर्ती झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व चाचण्या झाल्या आहेत. कारची लांबी ३.६८ मीटर आहे. आतून पुरेशी जागा आहे.
स्पर्धेतील कार...
> ऑल्टो के १०
> इऑन
> वॅगन आर