आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या दुचाकींमध्ये आहेत कारमधील फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय दुचाकींची रोडमास्टर टुअररने गेल्या वर्षी भारताच्या रस्त्यांवर धावण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोत कंपनीने ही टुअरर पुन्हा नव्या रंगात सादर केली आहे. तिची थेट लढत हार्ले डेव्हिडसनच्या सीव्हीओ लिमिटेडशी आहे. इंडियन रोडमास्टर असो की मग हार्ले सीव्हीओ लिमिटेड, दोन्हीही आपापल्या कंपन्यांचे फ्लॅगशिप मॉडेल्स आहेत आणि देशाच्या रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वात महाग दुचाकीही आहेत.

भलेही या दोन्ही दुचाकींची सुरुवातीची किंमत ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरी देशात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. किंमत जास्त आहे म्हणजेच तीत दिलेले फीचर्सही विशेषच आहेत, हे निश्चित! विशेष आहेतही, काही फीचर्समध्ये तर टुअरर कारचा मुकाबला करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अशा रीतीने डिझाइन करण्यात आले आहेत की ४०० किलो वजन असूनही ते ईझी टू राइड आहेत. अर्थात देशात बीएमडब्ल्यू ‘के १६००’ टुअररही आहे, तिची किंमत ३६ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पण ती स्टाइल आणि डिझाइनबाबत या दोन्हींपेक्षा वेगळी आहे. देशात ट्रायम्फची टायगर एक्सप्लोरर फॅमिलीचे अॅडव्हेंचर टुअररही आहे. टुअरर प्रत्येक प्रकारच्या भागात उपयुक्त आहेत. तुम्ही ते रस्त्यावर चालवा वा ऑफ रोड चालवा. भारतात रोड ट्रिप्सचे चलन वाढले आहे. कंपन्या एकमेकांपेक्षा सरस टुअरर लाँच करत आहेत. जाणून घेऊया इंडियन रोडमास्टर, हार्ले डेव्हिडसन सीव्हीओ लिमिटेड आणि बीएमडब्ल्यूच्या १६०० विषयी..

रोडमास्टर
किंमत ३८,१४,२५० (एक्स शोरूम मुंबई)
- इंजिन : १८११ सीसी
- इंधन टाकीची क्षमता : २०.८ लिटर
- वजन : ४२१ किलो
- गिअर बॉक्स : ६ स्पीड
बातम्या आणखी आहेत...