आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Royal Enfield ची नवीन बाईक LAUNCH, 15 जुलैपासून बुकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्या महायुद्धातील डिस्पॅच मोटरसायकलला समोर ठेवून रॉयल एनफिल्डने क्लासिक 500 बाईकची नवीन एडिशन लॉंच केली आहे. या एडिशनचे लिमिटेड मॉडेल्स बाजारपेठेत उतरविले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ही बाईक केवळ ऑनलाईन विकली जाणार आहे.
काय आहे डिस्पॅच बाईक
दुसऱ्या महायुद्धात डिस्पॅच बाईकने महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली होती. लष्करी मुख्यालय आणि ग्राऊंड फोर्स यांच्यात समन्वय राखणाऱ्या तुकडीत या बाईकचा वापर केला जात असे. यासाठी उंच सखल भागातून ही बाईक चालवावी लागत असे. अशी गरज पूर्ण करण्यासाठी या बाईकची निर्मिती करण्यात आली होती. आता उंच सखल रस्ते नसले तरी याचा लुक लोकांना आकर्षित करतो. दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या बाईकर्सना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही बाईक बाजारपेठेत आणली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
भारतात दोनच कलरमध्ये मिळेल बाईक
मार्केटिंग स्ट्रॅटेजी अंतर्गत भारतात केवळ दोनच रंगात ही बाईक उपलब्ध होईल. बॅटल ग्रीन केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला समोर ठेवून लॉंच करण्यात आली आहे.

ही क्लासिक 500 बाईक तीन रंगात उपलब्ध होईल
1. डेझर्ट स्टॉर्म डिस्पॅच
2. स्क्वॉड्रन ब्लू डिस्पॅच
3. बॅटल ग्रीन डिस्पॅच
15 जुलैपासून बुकिंग
15 जुलैपासून या बाईकचे बुकिंग सुरु होईल. सुरवातीला प्रत्येक श्रेणीत केवळ 200 बाईक्स आणल्या जाणार आहेत.
लिमिटेड क्लासिक 500 एसचे फिचर्स:
- जिनिअस इटॅलियन सीट्स
- एअर फिल्टर बॉक्ससाठी क्लासिक लेदर बक्कल स्ट्रेप
- इंजिन, एग्जॉस्ट आणि साइलेंसरवर मॅच ब्लॅक पेंट
- इंजिन 500 सीसीचे आहे
भारतात 400 आऊटलेट्स
रॉयल एनफिल्डचे भारतात भरपूर चाहते आहेत. सध्या देशात या प्रकारच्या बाईक्सचे 400 आऊटलेट्स आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत यांची संख्या 500 करण्याचा कंपनीचा मानस आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रॉयल एनफिल्ड बाईकचे कलर व्हेरायंट...