आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप-10 रॉयल फॅमिलीज् आणि त्यांच्या एकापेक्षा एक आलिशान गाड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक देशांमध्‍ये आजही राजेशाही आहे. तिथे राजा आणि राणी राज्य कारभार पाहतात. राजेशाही जीवनशैलीबरोबरच त्यांच्या रॉयल कार्सचेही नेहमी उल्लेख येत असतात. अरब देशांव्यतिरिक्त ब्रिटन, जपान, थायलंडसारख्‍या देशांमध्‍ये आजही राजा किंवा राणीचे शाही गाड्या जेव्हा निघतात तेव्हा लोक पाहतच राहतात. प्रवासासाठी बाहेर निघाले असता त्यांच्या मागे लांबच लांब गाड्यांचा गराडा असतो. ज्यात एकापेक्षा एक कार्स असतात. यात ब्रुनेईचे सुलतानने आपल्या प्रचंड संपत्तीतून 7 हजार कार्सचे संग्रह केले आहे. यात 600 रोल्स रॉयस, 209 बीएमडब्ल्यू, 574 मर्सिडिज बेंझ, 179 जग्वार्स, 382 बेंटली, 134 कोएनसेग, लंबोरघिनीस, अॅस्टोन मार्टीन, एसएससी, सिसेरो बीडीबी मेस्ट्रो यांच्यासह 452 फरारीज आहेत. याबाबतीत अरब देशांतील शासक मागे नाहीत. त्यांचे कार्स सोने-चांदी आणि हि-यामोतींनी जडलेली असतात.
राजा महाराजांच्या राजेशाही वाहनांच्याबाबत भारतही मागे नाही. येथील अनेक संस्थानांच्या राजांकडे विंटेज कार्सचे संग्रह आहे. यातील अनेक जण आजही त्यातून प्रवास करतात. तर चला जाणून घेऊ या जगातील निवडक 10 राजघराण्‍यांच्या राजेशाही वाहनांविषयी... यातील काही जण विंटेज कार तर काही प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असे कार्स वापरतात...

पुढील स्लाइड्सवर वाचा जगातील 10 राजेशाही कुटूंब आणि त्यांच्या वाहनांविषयी