आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच सादर होणार २०१५ ची लक्षवेधी दुचाकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- इटालियन दुचाकी उत्पादक कंपनी दुकातीने नवी स्क्रॅम्बलर स्पोर्ट्स बाइक सादर केली आहे. २१ व्या शतकातील क्लासिकल व चालवण्यास सोपी दुचाकी म्हणून ही ओळखली जाईल. स्क्रॅम्बलरची किंमत ७ लाख रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. या महिन्यातच ती सादर होईल. २०१५ या वर्षातील सर्वात लक्षवेधी दुचाकी म्हणून तिला पूर्वीच मान्यता मिळाली आहे. चालकाच्या दृष्टीनेही ती उत्कृष्ट ठरेल.
- दुकातीने सर्वप्रथम मॉन्स्टर ७९५ बाइक भारतात सादर केली होती. ही दर्जेदार असूनही त्यात काही उणिवा होत्या. नवी बाइक मॉन्स्टरशी मिळती-जुळती आहे. स्क्रॅम्बलरची पॉवर ७३.७ बीएचपी व टॉर्क ६.९ ग्रॅम आहे. पॉवरबँडला वाढवण्यासाठी यात नवे कॅमशॅफ्ट व री-कॅलिब्रेटेड ईसीयू आहे.
- नवी एक्झॉस्ट सिस्टिम आहे. स्क्रॅम्बलरचा लूक व फीलही वेगळा आहे. पहिल्या राइडमध्ये अॅर्गोनॉमिक्स फ्रेंडली वाटते. हँडलबारची लांबी -रुंदी जास्त आहे.
- इंजिन लेआउट एल-ट्विन, एअर कुल्ड, फोर-स्ट्रोक आहे. यात ६- स्पीड, १-डाउन, ५-अप गिअरबॉक्स आहे. १३.५ लिटर इंधन क्षमता आहे. वजन १८६ किलो आहे.
- डिझाइन डिटेलिंगवर विशेष भर दिलाय. यासाठी दुकाती शिल्डचा वापर केला आहे. यात फ्युएल गाॅज व गिअर प्रोजिशन इंडिकेटर नाही.
- मोटरसाठी नवी, आकर्षक केस दिली आहे. सॉफ्ट ग्लोसाठी यात नवे एलईडी आहेत. याच्या टू-इन-वन एक्झॉस्टला
हाय माउंटेड एक्झॉस्टने बदलता येते. मॉन्स्टर ७९५च्या तुलनेत हिची क्षमता जास्त
आहे. व्हीलबेस १४४५ एमएम असून आकर्षक आहे.