आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट कार चालवण्याची गरज नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंचलित कारविषयी तीन गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
पहिली - ती आली आहे.

मागीलवर्षी टेस्ला मोटार्सने जगभरातील आपल्या वाहनात एक सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. नवीन कोडमध्ये कारमध्ये आधीपासून असलेले सेन्सर, कॅमेरे, जीपीएस आणि अन्य उपकरणांमध्ये ताळमेळ अशा प्रकारे बसवला आहे की, तथाकथित ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग व्हावी. चालकाच्या सीटवर मनुष्यच बसेल जेणेकरून आवश्यकता पडल्यास तो चालकाची जबाबदारी सांभाळू शकेल. काही सप्ताहाआधी रैली चालकांचे एक पथक टेस्ला कारचे मॉडेल एस लॉस एंजिलिसहून न्यूयॉर्कला आणले. या कारने स्वयं ९६ टक्के रस्ता निवडून मार्गक्रमण केले. कारमध्ये बसलेल्या, परंतु कार चालवता बसलेल्या चालकांनी पुस्तके वाचली, ब्रशने दात घासताना मोबाइलवरून आपले व्हिडिआे पोस्ट केले. टेस्लाचे मालक एलोन मस्कने दावा केला आहे की, त्यांची इलेक्ट्रिक कार तीन वर्षांच्या आत पूर्णत: स्वयंचलित होणार आहे. प्रमुख कार निर्माते जनरल मोटार्सपासून तर मर्सिडीज बेन्जने पुढील काही वर्षांत ऑटोनॉमस अर्थात स्वयंचलित कार विक्री करण्याची घोषणा केली आहे. फोर्ड आणि टोयोटानेही अशा कार बनवण्याविषयी तयारी दर्शवली आहे.

दुसरी - ती चांगली चालक आहे.
हेशब्द लोकांच्या कानाला त्रासदायक वाटतील. परंतु, संगणक मनुष्याहून चांगला चालक आहे. संगणक अन्य चालकांवर नियंत्रण ठेवण्याचे चांगले कार्य करू शकते. सदैव वेगाने कार चालवू शकते. जीपीएस, वेग, वाहतुकीच्या कोंडीसहित सर्व प्रकारच्या डाटावर तत्काळ प्रतिसाद देऊ शकते. कारमध्ये बसलेली पत्नी मुले संगणकाचे लक्ष विचलित करू शकत नाहीत. संगणक इच्छा असेल तरी मार्गावरील लक्ष हटवू शकणार नाही. संगणकांचे आवडीचे काम आदेश घेणे आहे. आदेश मिळेपर्यंत संगणक झोपतसुद्धा नाही.

तिसरी : ते सर्व काही बदलणार आहे
त्यांचेआर्थिक आणि सुरक्षाविषयक प्रभाव व्यापक स्वरूपात आहेत. नैतिक आणि कायदेविषयक आव्हाने कठीण आहेत. आमच्या युगात डिजिटल देखरेख करणारे तसेच मानवरहित ड्राेन विमानांसारख्या विवादास्पद संशोधनामध्ये स्वयंचलित कारचा समावेश होण्याची शक्यता आहे. मानव आणि मशीन यांच्या क्षमतेत खूप अंतर असल्याने चालकविरहित कारला वैधता प्रदान केल्यानंतर पुढचे पाऊल त्यांना अनिवार्य करावे लागेल. प्रश्न असा की, होणाऱ्या चुकांसाठी जबाबदार कोण राहील? जीवन आणि मृत्यू यांचा निर्णय संगणक कसे करू शकतील. हे प्रश्न येणाऱ्या वर्षांमध्ये नीती ठरवणारे तसेच वकिलांसमोर उभे राहील.

अपघातांची संख्या पाहता असे म्हटले जाऊ शकते की, चालकांशिवाय जग सुरक्षित तसेच निवासयोग्य राहू शकेल. अमेरिकेत दरवर्षी ६० लाख कार अपघात होतात. त्यामध्ये ३३ हजार लोकांचा मृत्यू होतो. २० लाख लोक जखमी होतात. जगात वाहनांच्या अपघातात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू होतो. सुरक्षेच्या क्षेत्रात उंच उडी घेण्याचा स्वाभाविक उपाय चालकांना दूर ठेवणे हा राहू शकतो. १२ वर्षांपूर्वी अमेरिका सरकारने स्वयंचलित वाहनांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या वेळी कोणताही चालक वाळवंटात २४० कि.मी.चा रस्ता पार करू शकला नाही. सर्वाधिक यशस्वी रोबो कार ११ कि.मी. अंतरावर जाऊन बंद पडली. गुगलद्वारा तपासण्यात आलेल्या कारने रस्त्यावर वीस लाख किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. यादरम्यान, १७ अपघात झाले. यासाठी चालक दोषी होते. जानेवारीमध्ये उत्तर अमेरिका आंतरराष्ट्रीय ऑटो शोमध्ये अमेरिकेचे परिवहन मंत्री अँथनी फॉक्स यांनी स्वयंचलित कारच्या संशोधनावर भर देण्यासाठी येत्या दहा वर्षांत २७० अब्ज रुपये खर्च करण्याची घोषणा केली. फेब्रुवारीमध्ये नॅशनल हायवे वाहतूक सुरक्षा प्रशासनाने म्हटले, मानवरहित वाहने नियंत्रित करणाऱ्या संगणकाला कायद्यानुसार चालक मानले जावे. त्यामुळे संबंधित कंपन्यांना वैधता प्राप्त होईल.

पार्किंगमध्ये बदल होतील. अमेरिकेत ७,७७० वर्ग किलोमीटर जागेचा उपयोग पार्किंगसाठी होतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे स्पष्ट झाले की, कोणत्याही महानगरात ३० टक्के चालक रिकामी जागा शोधण्यासाठी फेऱ्या घालतात. ऑटोमॅटिक कार आपल्या प्रवाशांना त्यांच्या निश्चित जागेवर सोडेल आणि रिकाम्या जागेचा सिग्लन घेईल आणि रवाना होईल. परत जाण्यासाठी प्रवासी आपल्या स्मार्ट फोनला टॅप करून कार बोलावू शकणार आहेत. टेस्लोच्या सॉफ्टवेअरमध्ये समनसारख्या फंक्शनचा समावेश आहे की, जे जवळच्या पार्किंगवरून कार बोलावू शकणार आहे. व्हॉल्व्होच्या सेल्फ कार ड्रायव्हिंग प्रोजेक्टचे प्रमुख एरिक कोएलिंग यांच्या मते, जर अपघातविरहित कार असेल, तर रस्त्यांना नव्या पद्धतीने पुन्हा डिझाइन करावे लागेल. रस्ते ३.५ मीटर रुंद का राहतात, कारण, मानव सरळ गाडी चालवू शकत नाही. वाहने निर्धारित भागाने चालतील तर पूल, ओव्हरब्रीज, अंडरब्रीजही कमी खर्चात बनतील.अनेक लोक, सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांचा मोठा अपघात झाल्यास ते वाहन भंगारमध्ये बदलण्याची शक्यता व्यक्त करतात. हॅकिंगच्या समस्येवरही लक्ष देण्यात आले नाही. . एलोन मस्क यांच्या मते, २०२३ च्या जवळपास चालकविरहित कारचा काळ येईल. गुगलचे रे कुर्जवील यांच्या मते दहा वर्षांत असे होईल. इंडस्ट्रीच्या समीक्षकांच्या मते २०३५ ते २०५० पर्यंत हा बदल होऊ शकते.

स्मार्ट कारसाठी लांब मार्ग
१९३९ मध्ये जागतिक कार मेळ्यात सेल्फ ड्रायव्हिंग कारची स्तुती करण्यात आली. टेस्लाने आपल्या कारमध्ये नुकतेच नवे फीचर जोडले आहेत. गुगल आणि मर्सिडीज बेंजने या दिशेने भविष्याचे चित्र दाखवले आहे. गुगलचे प्रोटोटाइपमध्ये स्टेयरिंग व्हील आणि पॅडल नाही. गुगल आणि फोर्ड यांच्यामध्ये प्रोडक्शन २०२० पर्यंत सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. मर्सिडीज बेंजची एफ ०१५ ची सीट १८० डिग्रीपर्यंत फिरणार आहे. त्यामुळे लोकं आमनेसामने बसू शकणार आहेत.
- १९३० - नॉर्मनबेल गेडेस यांनी कल्पना सादर केली
- २००५ दरपासेल्फ ड्रायव्हिंग कार
- २०१५ गुगल प्रोटोटाइप
- २०१५ मर्सिडीज बेंज एफ ०१५ ची संकल्पना
अब्जावधी रुपयांची बचत
इनो ट्रान्स्पोर्टेशन सेंटरच्या अभ्यासानुसार अमेरिकेत दहा टक्के वाहनांना सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये बदलल्याने प्रत्येक वर्षी दोन लाख ११ हजार अपघात कमी होतील. सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीकडे लक्ष देत व्हॉल्व्होने २०२० पर्यंत आपल्या नव्या कारमध्ये शून्य मृत्यूचे लक्ष्य ठेवले आहे. मोर्गन स्टेनलेच्या विश्लेषणानुसार अमेरिकेत चालकविरहित कार आल्यानंतर प्रत्येक वर्षी ८९ खर्व रुपयांची बचत होणार आहे. यामध्ये इंधनाची बचत १०,८०० अब्ज रुपयांचाही समावेश आहे.

नुकसानही मोठे
सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या क्रांतीने खूप नुकसानही होणार आहे. १३,६३८ अब्ज रुपयांची ऑटो इन्शुरन्स इंडस्ट्री, ६,८८७ अब्ज रुपयांची पार्किंग इंडस्ट्री आणि कारच्या साहित्यांसह अन्य ऑटो सामानच्या २०,६६३ अब्ज रुपयांची इंडस्ट्री प्रभावित होणार आहे. कंसल्टिंग फर्म केपीएमजीच्या सर्व्हेमध्ये अंदाज लावण्यात आला आहे की, स्मार्ट कारमुळे येत्या २५ वर्षांत ऑटो इन्शुरन्स इंडस्ट्री आजच्या तुलनेत केवळ ४० टक्केच राहणार आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.