आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेंज रोव्हर मालिकेत समाविष्ट नवी एसयूव्ही वेलार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा मोटर्सच्या मालकी हक्काची रेंज रोव्हर वेलार अधिकृत  स्वरूपात सादर केली आहे. ही रेंज रोव्हर मालिकेतील चौथी कार असेल. ही कार  अद्याप भारतात सादर झालेली नाही. ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ती समोर येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार याची स्पर्धा बीएमडब्ल्यू एक्स ५, आॅडी क्यू ७, व्होल्व्हो एक्ससी ९०, जग्वार एफ पेस आणि पॉर्शे मॅकन यांच्याशी असेल. वेलारचे लंडनमध्ये ६ मार्चपर्यंत प्रदर्शन होईल.
 
- कंपनीनुसार वेलारला फक्त जेएलआरच्या फ्लॅगशिप सोलिहुल प्लँट (वेस्ट मिडलँड, इंग्लंड) मध्येच तयार केले जाईल. यास डिझेल, पेट्रोल दोन्ही व्हेरियंटमध्ये सादर केले जाईल.  
- याचा व्हीलबेस २ हजार ८७४ मिलिमीटर आहे व ६७३ लिटरचा बूट स्पेस दिला गेला आहे.  
- यास खूपच आरामदायी लूक दिला आहे. यात पॅनोरमा रूफ व आधुनिक डॅशबोर्ड असेल.
- कारमध्ये २.० लिटरचे डिझेल इंजिन असून ते १७८ बीएचपी पॉवरचे व ४३० एनएम टॉर्क उत्पन्न करते. याशिवाय अन्य पर्यायाच्या स्वरूपात ३.० लि. इंजिनचे व्हेरिएंट असेल, जे २९६ बीएचपीच्या ताकदीचे व ७०० एनएमचे टॉर्क उत्पन्न करेल.  
- हेडलाइटमध्ये लेझर टेक्नॉलॉजी आहे.  
- याच्या पेट्रोल व्हेरिएंटचे बोलाल तर २.० लिटर इंजिन २४७ बीएचपी पॉवर आणि ३६५ एनएम टॉर्क उत्पन्न करते आहे. तथापि, ३.० लिटर पेट्रोल इंजिन ३७५ बीएचपी पॉवर आणि ४५० एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते आहे.  
- याच्या सर्व व्हेरियंटमध्ये ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिले गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...