(फोटोः टाटा मोटर्सची नवी NANO Zen X)नवी दिल्ली-टाटा मोटर्सची नवी कार NANO Zen X या महिन्यात सादर होणार आहे. NANO Zen X ही कार फुल्ली ऑटोमॅटीक असून लवकरच XE, XM, XT मॉडेल उपलब्ध होतील. नव्या NANO ची बेस प्राइज 2.7 लाख रुपये असेल. टाटाच्या नव्या कारची बुकिंग सुरु झाली आहे. पाच हजार रुपये बुकिंग अमाउंट ठेवण्यात आली आहे.
ऑटोमॅटिक गिअर...
NANO Zen x ला ऑटोमेटिक गिअर आहेत. मॅन्युअल गिअर बदलण्याची कटकटीपासून चालकाची सूटका होईल. त्याचप्रमाणे महिलाही ही कार अगदी सहज चालवू शकतील. मारुती अल्टो के10 नंतर टाटाने NANO Zen X च्या रुपात पहिली ऑटोमेटिक गिअर असलेली छोटी कार लॉन्च केली आहे.
डेमसन पर्पल, संगरिया रेड, रॉयल गोल्ड, डेजल ब्लू, पर्ल व्हाइट, मेटिओर सिल्व्हर आणि पर्शियन रोज सारख्या कलर्समध्ये ही कार उपलब्ध होईल.
हे आहेत नवे फीचर्स...
बाह्यरुपासोबत या कारच्या इंटीरियरवर खास लक्ष देण्यात आले आहे. पॉवर स्टेअरिंग, एअर-कंडिशनिंग विथ हीटर आणि सेंट्रल लॉकिंगसारखे लेटेस्ट फीचर्स दिले आहेत. उल्लेखनिय म्हणजे कारमध्ये ब्लूटूथ, मल्टिमीडिया इन्फोटेनमेंट सिस्टम आणि युएसबी कनेक्टिव्हिटीही मिळेल.
अन्य फीचर्स...
- ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन- पावर स्टेअरिंग
- 21.9 KMPLचा मायलेज
- न्यु कंसोल
- सेंट्रल लॉकिंग सिस्टम
पॉवरफूल इंजिन
NANO Zen X मध्ये 624सीसी 2-सिलिंडर असलेले पेट्रोल इंजिन बसवलेले आहे. 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत एएमटीही असेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, New NANO Zen X ची छायाचित्रे...