आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा मोटर्सची पहिली स्पोर्ट्स कार ‘रेस्मो’ 2017-18 मध्ये बाजारात,‘जग्वार’ची लँड रोव्हर डिस्कव्हरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट््स कार ‘रेस्मो’च्या प्रदर्शनावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि  टाटा मोटर्सचे एमडी तसेच सीईओ गुंटर बुटचेक. - Divya Marathi
स्पोर्ट््स कार ‘रेस्मो’च्या प्रदर्शनावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टाटा मोटर्सचे एमडी तसेच सीईओ गुंटर बुटचेक.
जिनेव्हा - अॅपल, गुगल आणि उबेरमुळे समस्यांचा सामना करत असलेला ऑटो उद्योग आता खरेदीदारांना नवीन अनुभव देण्याची तयारी करत आहे. नवीन कार तुमच्या आवडीच्या कॉफी शॉपमध्ये पार्किंगची जागाच आरक्षित करणार नाही, तर तुमच्या आवडीनुसार रेस्तराँमध्ये ऑर्डरदेखील देईल. भारतात टाटा मोटर्सचा सह-ब्रँड “टामो’ आपल्या पहिल्या स्पोर्ट््स कारमध्ये “रेस्मो’ फीचर्स घेऊन येत आहे. मंगळवारी जिनेव्हामध्ये आयोजित मोटर प्रदर्शनात रतन टाटा यांच्या उपस्थितीत ही कार सादर करण्यात आली. भारतातील ६५ टक्क्यांपेक्षा जास्त युवकांची लोकसंख्या लक्षात घेऊन विकसित केलेली ही टू-सीटर कार २०१७-१८ मध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे.  
 
इतर कारमध्येही तंत्रज्ञानाचा वापर  
या तंत्रज्ञानाचा वापर सध्या फक्त स्पोर्ट््स कारसाठी करण्यात आला असल्याचे टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुंटर बुटचेक यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व प्रवासी वाहनांमध्ये या तंत्रज्ञानाचा कंपनी वापर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी “पसाट’नेदेखील ऑटोमॅटिक कार पार्कची सुविधा दिली होती. मात्र, जास्त मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने हा प्रयोग यशस्वी झालेला नाही. टाटा मोटर्सचे अध्यक्ष (प्रवासी कार बिझनेस डेव्हलपमेंट) मयंक परीक यांनी मायक्रोसॉफ्टसह “रेसिंग गेम’ बाजारात आणला होता.  
 
इंजिन 
१.२ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन ६ सेकंदांत मिळेल ० ते १०० ची गती 
 
डिझाइन   
टाटाच्या इटलीमधील डिझाइन स्टुडिओमध्ये या कारचे डिझाइन तयार करण्यात आले.  
 
वैशिष्ट्य
सेन्सॉर कंपनीला डाटा पाठवेल, कंपनी कार चालकाच्या सवयीनुसार सल्ला देईल.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, ‘जग्वार’ची लँड रोव्हर डिस्कव्हरी- यावर लावलेल्या ‘ड्रोन डिझास्टर झोन’मुळे मिळेल अचूक माहिती... 
बातम्या आणखी आहेत...