आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्जिंगनंतर नॉन-स्टॉप ४०२ किमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंमत: १.३ कोटी रुपये (अंदाजे)

चर्चेत का
- स्टाइल जबरदस्त आहे.
- ४.२ सेकंदांत ताशी १०० किमी वेग.

सुधारणेस वाव
- कॅबिनचा दर्जा सुधारण्यास वाव.
- रेंजला आणखी चांगले करता येईल.

- टेस्ला मॉडेल एस इलेक्ट्रिक कार आहे. कारची स्टाइल स्मूथ असली तरी मस्क्यूलर आहे. कारच्या दमदार ड्रायव्हिंगचा, फीचर्सचा अंदाज वरकरणी पाहून येणार नाही. दरवाजा उघडताच कार स्विचऑन होते. यात इग्निशन स्विच नाही. यात स्टार्ट बटन किंवा हँडब्रेक देण्यात आलेले नाही. मर्सिडीझसारखे अनेक फीचर्स यात आहेत.

- कॅबिनचा दर्जा उत्तम आहे. मात्र त्यात फारसे वेगळेपण नाही. कॅबिन स्पेस चांगली आहे. यात १७ इंची टचस्क्रीन देण्यात आले आहे. यामुळे कॅबिन अधिक आकर्षक दिसते. टचस्क्रीनमध्ये कारचे सर्व फीचर्स नियंत्रण करण्याची क्षमता आहे. एअर कंडीशनर, एअर सस्पेंशन, सनरूफ, चार्ज सॉकेट फ्लॅप सर्व स्क्रीनद्वारे नियंत्रित करता येते.

- नेव्हिगेशन सिस्टिम ३ जी नेटवर्कच्या माध्यमातून चालते. ४.२ सेकंदांत कार ताशी १०० किमी वेगाने धावते. कारमध्ये ड्राॅयव्हिंग डायनामिक्स मात्र यथातथाच आहेत.

- कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाची कसोटी लागते ती त्याच्या रेंजवरून. या बाबतीतही टेस्ला सर्वात आघाडीवर आहे. एकदा चार्ज केल्यावर सलग ४०२ किलोमीटर प्रवास करणे सहज शक्य आहे. कारला चार्ज करण्याच्या विविध पद्धती आहेत. टेस्ला सुपर चार्जरने लवकर चार्जिंग होते. याच्या साहाय्याने २० मिनिटांत कार ५० % चार्ज होते. इलेक्ट्रीक श्रेणीतील कारपैकी ही सर्वात हायटेक ठरते.
बातम्या आणखी आहेत...