आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Man Who Penned The First Traffic Laws Never Drove A Car Himself

Father of Traffic Safety: कधी ड्रायव्हिंग न करणार्‍यानेच बनवले ट्रॅफिक रूल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिग्नल्स व साइन बोर्डच्या मदतीने आज जगभरातील ट्रॅफिक नियंत्रित करण्यात येते. मात्र, तुम्हाला माहीत आहे काय? ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे साइन बोर्ड बनवणार्‍या व्यक्तिला ड्रायव्हिंग येत नव्हती. विल्यम फ्लेप्स एनओ (William Phelps Eno) यांनी जगातील पहिले ट्रॅफिक कोड तयार केले.

विल्यम यांनी STOP साइन बनवले, इतकेच नव्हे तर ट्रॅफिक सर्कल, वन-वे रोड, टॅक्सी स्टॅड व पायी चालणार्‍या लोकांसाठी क्रॉसवॉकचे (झेब्रा क्रॉसिंग) डिझाइन केले. मात्र, त्यांनी स्वत: कधी ड्रायव्हिंग केले नाही. 1912 मध्ये फ्रान्स पोलिसांना विल्यम फ्लेप्स एनओ यांच्या सन्मानार्थ त्यांना मानद ड्रायव्हिंग लायसन्स प्रदान केले होते. परंतु, या लायसन्सचाही त्यांनी कधी वापर केला नाही.

कार ड्रायव्हिंगला मानत होते 'लहर'
विल्यम यांना हॉर्सरायडिंग खूप आवडत असे. परंतु ऑटोमोबाइलवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. ड्रायव्हिंग म्हणजे एक लहर असल्याचे ते समजत असत. त्यामुळेच त्यांना कधी ड्रायव्हिंग शिकले नाही.

न्यूयॉर्क शहरासाठी बनवले जगातील पहिले ट्रॅफिक कोड
न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या विल्यम यांनी (1858-1945) ट्रॅफिक जामची समस्या सोडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तत्कालीन काळात घोडागाडी व बग्गींमुळे अनेक अडचणी येत होत्या. 1903 मध्ये विल्यम यांनी जगातील पहिले सिटी ट्रॅफिक कोड (न्यूयॉर्क शहरासाठी) तयार केले. त्यापाठोपाठ लंडन व पॅरिससाठी देखील ट्रॅफिक कोड तयार केले. यामुळे विल्यम यांना Father of Traffic Safety असे संबोधण्यात येते.

1921 मध्ये बनवले Eno फाउंडेशन
विल्यम यांनी 1921 मध्ये वॉशिग्टनमधील डीसीत Eno Transportation Foundation ची स्थापना केली. हे एक नॉन-प्रॉफिट स्टडी सेंटर होते. जमीन, हवा व पाणी ट्रान्सपोर्टेशनसाठी इम्प्रूव्ह करण्‍याण्याचे काम या माध्यमातून केले जात होते.

पुढील स्लाइडवर पाहा, ड्रायव्हिंग येत नसलेल्या व ट्रॅफिक रूल्स बनवलेल्या व्यक्तिचे फोटोज्...