आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात लॉंच होणार या 5 Stylish Car, भारतात SUV सेगमेंटची भरभराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- फेस्टिव्हल सीजनपूर्वी ऑटोमोबाईल कंपन्यांनी काही मोठ्या कार लॉंच केल्या. यात टाटा मोटर्सची पहिली कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) नेक्सॉन, स्कोडाची पहिली ७ सीटर कार Kodiaq या व्यतिरिक्त मारुती सुझुकीची नवीन एस-क्रॉस सारख्या कारचा समावेश आहे. कार कंपन्यांनी खास करुन एसयुव्ही सेगमेंटवर भर दिला आहे. हेच चित्र नोव्हेंबर महिन्यातही दिसून येत आहे. या महिन्यातही काही लग्झरीअस कार लॉंच होणार आहेत. यात रेनो इंडिया, लेक्सस, मर्सडीज-बेंज आणि मारुती सुझुकी कंपन्यांचा समावेश आहे.
 
रेनो कॅप्चर
रेनो इंडियाकडून कॅप्चर ही कार ६ नोव्हेंबर रोजी लॉंच केली जाणार आहे. रेनो इंडिया ऑपरेशनचे कंट्री सीईओ आणि एमडी सुमित सहानी यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांमध्ये एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठी ग्रोथ दिसून आली आहे. भारतात हे सेगमेंट वेगाने पुढे जात आहे. रेनो कॅप्चर यशस्वी प्रिमियम एसयुव्ही आणि आकर्षक डिझाईन, प्रिमियम आणि क्लास फिचर्ससाठी ओळखला जातो. या कारची बुकिंग सुरु झाली आहे. केवळ २५ हजार रुपये भरुन ही कार बुक केली जाऊ शकते.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, आणखी कोणत्या लग्झरीअस कार नोव्हेंबरमध्ये लॉंच होणार आहेत...
बातम्या आणखी आहेत...