आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Top Four Hatchback Cars Offer Eye catching Features

दिवाळीला तुम्ही खरेदी करु शकतात या बेस्ट फीचर्स व मायलेजच्या कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या दिवाळीला तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुमचे उत्तर जर 'हो' असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बाजारात आज विविध कार लॉन्च झाल्या आहेत. मारुती सुझुकीने स्टायलिश प्रीमियम हॅचबॅक बलेनो लॉन्च केल्यानंतर बाजारात स्पर्धा वाढली आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी बेस्ट फीचर्स व मायलेज असलेल्या चार कारविषयी माहिती देत आहोत.

Honda Jazz
होंडा कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक Jazz कारला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. न्यू फीचर्स, डिझाइन, मायलेज व परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार शानदार आहे. या कारची जवळपास 90 टक्के निर्मिती ही भारतात झाली आहे. त्यामुळे या कारची किंमत कमी आहे. Jazz चे पेट्रोल व डिझेलचे दोन्ही मॉडेल उपलब्ध आहेत. कारमध्ये 354 लिटरचे बूट स्पेस देण्यात आले आहे. या सेग्मेंटमध्ये ते सगळ्यात जास्त आहे.

दुसरी सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार...
होंडा Jazz च्या डिझेल मॉडेलमध्ये 1.5 लिटरचे इंजिन देण्यात आले आहे. ते 100 बीएचपीची पॉवर तसेच तथा 200 एनएमचा टॉर्क निर्माणळ करते. एआरएआयनुसार या कारचा मायलेज 27.3 किलोमीटर प्रतिलिटर आहे. भारतातील सेलेरियो डिझेल कारनंतर Jazz चे मायलेज आहे.
पेट्रोल मॉडेलमध्ये 1.2 लिटरचे आई-व्हिटेक इंजिन देण्यात आले आहे. ते 90 पीएसची पॉवर व 115 एनएमचा टॉर्क निर्माण करते.

असे आहेत फीचर्स
होंडा Jazz ला होंडा City सारख डेशबोर्ड देण्यात आला आहे. याच्या टॉप एंड व्हेरियंटमध्ये 6.0 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. लोअर व्हेरिएंट्समध्ये 5.2 इंचाचा कलर स्क्रीन देण्यात आला होता. स्पेशल फीचर्सच्या रुपात क्लाइमेट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा, हाइट अॅडजेस्टेबल ड्रायव्हिंग सीट व ऑटो फोल्डिंग मिरर देण्यात आले आहे.

किंमत:
होंडा Jazz ची किंमत 5.30 लाख रुपयांपासून पुढे आहे. पेट्रोल मॉडेलची किंमत 7.85 लाख रुपये आहे तर डिझेल व्हेरिएंट्‍सची किंमत 6.49 लाख रुपयांपासून पुढे असून टॉप मॉडेलची किंमत 8.59 लाख रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मारुती सुझुकीची कार बलेनोचे स्पेसिफिकेशन्स ...