आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thousands Of Luxury Cars Are Being Sold At Throw Away Prices

केवळ 2 लाखांत विकल्या जात आहेत Mercedes, BMW, Audi सारख्या महागड्या कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्सिडीझ बेंझ, बीएमडबल्यू, ऑडी, जगवार, पोर्शे आणि बेंटले अशा एकापेक्षा एक क्लासिक ब्रँडच्या कार घेण्याचे स्वप्न आपण प्रत्येक जण पाहत असतो. पण या कारच्या किमती पाहता सर्वसामान्यांच्या आवाक्यात शक्यतो या कार लवकर येत नाहीत. पण कारबद्दल खरं प्रेम असूनही केवळ बजेटमध्ये नाही म्हणून केवळ या कारकडे पाहून समाधान मानणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. चेन्नईमध्ये दोन-दोन लाखांत अशा एकापेक्षा एक सरस कार विक्रीला काढल्या आहेत.

हे ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल. पण ते खरे आहे. चेन्नईमध्ये या सर्व ब्रँड्सच्या गाड्या दोन दोन लाख रुपयांमध्ये लिलावात काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कार फॉल्टी नाहीत. तर चेन्नईला नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामध्ये या कार्सचे नुकसान झालेले आहे. चेन्नईतील व्हॉल्व्होच्या शोरूममध्ये या कार अगदी कमी किमतीमध्ये विक्री केल्या जात आहेत. या कारचे विमा कंपन्यांकडून दुरुस्ती होऊ शकेल यापेक्षा जास्त नुकसान झाल्याने त्या डॅमेज्ड कार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अशा आहेत किमती
- BMW 3 सिरीजच्या कारची किंमत 6 लाखापासून सुरू होते.
- 2015 च्या Audi A4 सिरीजची कार 3.4 लाखात उपलब्ध आहे.
- पोर्शे कायेन (2012 model) हे 5 लाख रुपयांत उपलब्ध आहे.

30 हजार कारचे नुकसान
- मूळ किमतीच्या 40 टक्के किमतीमध्ये कार उपलब्ध आहेत.
- सुमारे 10 हजार कार्स याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे सुमारे 30 हजार कारचे नुकसान झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS