आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटाने तयार केली लाकडी कार, वयानुसार वाढेल \'सौंदर्य\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे असेल या कारचे इंटेरियर.... - Divya Marathi
असे असेल या कारचे इंटेरियर....
जपानच्या टोयोटाने लाकडापासून "सेतसुना' कन्सेप्ट कार बनवली आहे. जपानी भाषेत "सेतसुना'चा अर्थ "क्षण' असा होतो. मात्र, या कारची योग्य निगा राखली तर ती अनेक पिढ्यांपर्यंत चालेल, असा दावा कंपनीने केला आहे.

एकही खिळा किंवा स्क्रू नाही
कारचेभाग जोडण्यासाठी खिळा वा स्क्रूचा वापर करता जपानचे परंपरागत तंत्र "ओकुरी अरी' किंवा "कुसाबी'चा वापर केला. कारचा बाहेरचा भाग देवदार लाकडापासून, तर सीट तयार करण्यासाठी "कॅस्टर अरेलिया' लाकडाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड जपानमध्ये परंपरागत टेबल बनवण्यासाठी वापरले जाते.
वयानुसार सौंदर्य वाढेल
लाकडाच्या फर्निचरप्रमाणेच ही कार जितकी जुनी होईल तितकीच ती सुंदर दिसेल. तिचा रंगदेखील बदलत जाईल. विशेष म्हणजे यात मेटल बाॅडीवर लाकूड लावलेले नाही, तर संपूर्ण कारच लाकडापासून बनवलेली आहे.
वेग ताशी ४५ किमी
सेतसुनाकार बॅटरीवर चालते. एका वेळी चार्ज केल्यास ती २५ किलाेमीटर जाऊ शकेल, तर तिचा वेग ताशी ४५ किमीचा असणार आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, कशी आहे ही स्टायलीश कार.... असे असेल इंटेरिय र....