आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन विमानकंपन्यांतील स्पर्धा रोचक वळणावर, डेल्टाचा अलास्काशी सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सिएटल टेकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सी टेक ) सध्या जबरदस्त उलटफेर होत आहेत. ते अमेरिकन विमान कंपन्यांमधील सगळ्यात मोठे लढाईचे मैदान आहे. एकीकडे अलास्का एअरलाइन्स आहे. बाजार हिश्श्याच्या विचार करता ती अमेरिकेची सहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. त्यांची अधिकांश विमाने सीटेक येथील मुख्यालयापासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या १०० हून अधिक विमानतळांवर ये - जा करतात. त्यांनी चांगली सेवा देत यश प्राप्त केले आहे. दुसरीकडे डेल्टा विमानकंपनी आहे. त्यांची विमाने स्टॉकहोम, शांघायसह सर्वत्र जातात. यात्री संख्येचा विचार करता ही जगातील सगळ्यात मोठी विमानसेवा देणारी कंपनी आहे. त्यांचे यश त्यांच्या विशाल संख्येवर टिकून आहे.
आता आतापर्यंत अलास्का आणि डेल्टा या एकमेकांच्या भागीदार कंपन्या आहेत. आता त्यांच्यात बाजारातील हिस्सा टिकवण्यावरून स्पर्धा आहे. विद्यमान काळात विमानसेवा व्यवसायात अलास्का सर्वेात्तम आहे. इंटरनेटवर तिकीट विकणारी अलास्का ही पहिली प्रमुख विमान कंपनी आहे. त्या कंपनीला दरवर्षी ग्राहकसेवेचा पुरस्कार मिळतो. आपल्‍या लहान आकार आणि ग्राहक सेवेवर भर देत अलास्का नफा कमवत आहे. २०१५ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने १८२९ कोटी रुपये कमावले . अलास्काला सतत २६ व्या तिमाहीत फायदा झाला आहे.
अलास्का आणि डेल्टामध्ये प्रचंड फरक आहे. डेल्टाने गत तिमाहीत ८८ अरब रुपये कमावले आहेत. ते अलास्काच्या बाजारातील एकूण मूल्यापेक्षा १० टक्के अधिक आहे. त्यांची १५ हजार उड्डाणे दररोज प्रत्येक खंडात जाऊन पोहोचतात. अलास्काची उड्डाणे त्याच्या एक पंचमांश आहेत. ग्राहक सेवेच्या बाबतीत अलास्का खूप पुढे आहेत. त्यांनी आठ वेळा जेडी पॉवर रँकिंगमध्ये प्रथम मानांकन मिळवले आहे.
आशियाच्‍या वाहतुकीवर पकड मिळवण्यासाठी डेल्टाने सिएटलला आपल्या हालचालींचे केंद्र बनवले आहे. जिथून अलास्काची विमाने उडत होती. त्या भागातून डेल्टाने सिएटल जाणाऱ्या अन्य मार्गावर उड्डाणे सुरु केली आहेत. अलास्कारने त्याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन एअरलाइन्ससमवेत ताळमेळ वाढवला आहे. डेल्टाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सॉल्ट लेक शहरासहीत अनेक नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू केली आहेत.
डेल्टाने अलास्काशी प्रामाणिक ग्राहकांना जोडण्यासाठी सी टेक विमानतळावर प्रवाशांसाठी नवीन लाऊंज बनवण्यासह लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यांनी विपणनात खूप पैसा ओतला आहे. सिएटलच्या व्यावसायिक फुटबॉल संघाला नेण्याचा करार केला आहे. अलास्काने प्रत्युत्तरादाखल सिएटल सिहाकचा स्टार रसेल विल्सनला मुख्य फुटबॉल अधिकारी बनवले. डेल्टाने लवकरच बाजारातील मोठा हिस्सा हिसकावून घेतला आहे. सप्टेंबरमध्ये सी टेकमधील १८ टक्के प्रवासी डेल्टाच्या विमानातून प्रवास केला.
डेल्टा - अलास्काच्या स्पर्धेमुळे प्रवाशांचा फायदा होत आहे. सी टेकने प्रवास करणाऱ्यांना भाडे आणि अन्य खर्चात दहा टक्के बचत झाली आहे. डेल्टासारख्या कंपनीसमोर अलास्का कंपनीने प्रचंड क्षमतेचे प्रदर्शन घडवले आहे. या क्षेत्रात अलास्काने डेल्टा आणि एस अँड पीच्या ५०० कंपन्यांनाही मागे टाकले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..