आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UM Motorcycles Renegade Cruisers Specifications Pictures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार पेक्षाही अॅडव्हान्स फीचर्सने अद्ययावत आहे ही BIKE, \'हेल्मेट\'च सांगते सबकुछ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात एकापेक्षा एक दर्जेदार बाइक्स आहेत. परंतु, UM ग्लोबल कंपनीची RENEGADE DUTY बाइक ही सगळ्यात हटके आहे. बाइकमध्ये कार पेक्षाही अॅडव्हान्स फीचर्स आहेत. ऑटो एक्सपोमध्ये ही बाइक सादर करण्यात आले होते.

137.8cc च्या बाइकला ब्लाइंड स्पॉट मिरर आहेत. मिररमध्ये खास टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. उल्लेखनिय म्हणजे बाइकसोबत एक वैशिष्ट्यपूर्ण हेल्मेट तयार करण्‍यात आले आहे. त्यात एक सेन्सर बसवले आहे. अपघातापूर्वी हे सेन्सर चालकाला अलर्ट असते.|

Marutiची Alto आणि Tataच्या Nano पेक्षाही अॅडव्हन्स
सेन्सर असलेल्या RENEGADE DUTY बाइकमध्ये स्वस्त कारमध्ये येणार्‍या फीचर्सपेक्षाही अॅडव्हास फीचर्स आहेत. मारुतीची अल्टो आणि टाटाच्या नॅनोपेक्षा जास्त फीचर्सने ही बाइक परिपूर्ण आहे.

किंमत 1 लाख 10 हजार
RENEGADE DUTYची ‍किंमत 1 लाख 10 हजार रुपये असल्याची शक्यता आहे. मात्र, ही बाइक भारतीय बाजारात कधी लॉन्च होईल, याविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही.

'हेल्मेट' सांगते सबकुछ...
अॅडव्हान्स फीचर असलेल्या RENEGADE DUTY बाइकसोबत येणारे 'हेल्मेट' अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. हेल्मेटमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहे. 'हेल्मेट'द्वारा चालकाला अपघात होण्यापूर्वी अलर्ट दिले जाते. याशिवाय बाइकमध्ये कोणताही फॉल्ट होण्यापूर्वी चालकाला आधीच अलर्ट मिळेल. सोबतच फ्रंट मिररमध्ये बसवलेले लाइट्‍स देखील लागतील.

RENEGADE DUTY बाइकचे इतर स्पेसिफीकेशन्स वाचा पुढील स्लाइड्सवर...