आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कँडलने केली Volkswagenची पोलखोल, भारतात पॉप्युलर आहेत या चार CAR

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जर्मन कार मेकर कंपनी 'फोक्सवॅगन'च्या कार्समधील फेरफार झाल्याचे इमिशन टेस्टिंगमध्ये (प्रदूषण मात्रा) समोर आले आहे. या प्रकारामुळे जगातील ऑटो सेक्टर हादरले आहे.

'फोक्सवॅगन'ने आपली चूक कबूल केली आहे. कंपनीने एका सॉफ्टवेअरच्या आधारे एक कोटी 10 लाख डिझेल कारमध्ये इमिशन टेस्टिंगमध्ये फेरफार (प्रदूषणाची मात्रा) केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सॉफ्टवेयरमुळे इमिशन टेस्टचे अचूक निकाल दाखवत नाही. फोक्सवॅगन सारख्या कंपनीत पहिल्याचा असा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.

फोक्सवॅगनने आपली चूक कबूल केली आहे. त्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांनी घसरले आहेत. भारतीय ऑटो मार्केटमध्ये 'फोक्सवॅगन'च्या चार कार्स पॉप्युलर ठरल्या आहेत.

फोक्सवॅगन पोलो
किंमतः 5.33 ते 8.48 लाख रुपये
मायलेजः 16.47 KMPL

भारतीय बाजारात कंपनीने हे पहिले हॅचबॅक मॉडेल उतरवले आहे. पेट्रोल व डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये 1198cc चे 1.2L MPI 3 सिलिंड इंजिन बसवले आहे. हे इंजिन 75 PS वर 5400 ची RPM जनरेट करते. या व्हेरिएंटची किंमत 5.33 लाख रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे.

डिझेल व्हेरिएंटमध्ये 1498 cc चे 1.5L TDI 4 सिलिडर इंजिन बसवले आहे. इंजिनाचा मायलेज 20.14 KMPL आहे. या व्हेरिएंटची किंमत 6.68 लाख रुपये (दिल्ली एक्स शोरूम) आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये पॉवर स्टेयरिंग आहे. तसेच 45 लिटरचा फ्यूल टँक आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, या फोक्सवॅगनच्या या कार आहेत भारतात पॉप्युलर...