आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोक्सवॅगनची औरंगाबादेत किफायतशीर कार निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद - येत्या दोन वर्षांत औरंगाबाद व चाकण येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढण्याची फोक्सवॅगनची योजना आहे. औरंगाबाद व चाकण हे किफायतशीर कार निर्मितीचे केंद्र बनवण्याची कंपनीची तयारी सुरू असल्याची माहिती फोक्सवॅगनचे संचालक (प्रवासी कार) मायकेल मेयर यांनी दिली. व्हेंटो या मध्यम आकाराच्या सेडान कारचे नवे मॉडेल मंगळवारी कंपनीने सादर केले. नव्या व्हेंटोची किमत ७.८५ लाख ते ११.८७ लाख रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.

भारत ही फोक्सवॅगनसाठी महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे सांगून मेयर म्हणाले, येत्या दोन वर्षांत पाच नवे मॉडेल सादर करण्याची कंपनीची योजना आहे. बिटल ही जगविख्यात कार भारतात आणणार असून त्याशिवाय पसाट ही सेडान तर टिगुआन ही एसयूव्ही कारही भारतात सादर करण्यात येईल. यामुळे भारतीय बाजारपेठेतील कंपनीच्या मॉडेलमध्ये अधिक वैविध्य येईल.

शेंद्रा प्रकल्पातच ऑडीची निर्मिती
शेंद्रा येथे फोक्सवॅगन समूहाचा स्कोडा ऑटो इंडिया प्रा. लि. हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने जुळणी व्हायची. मात्र सप्टेंबर २००७ मध्ये ऑडी कारचा प्रकल्प सुरू झाला. २०१३ पासून ऑडीची निर्मिती सुरू झाली. त्यानुसार जुलै २०१४ मध्ये ऑडी -ए ३ ही कार शेंद्रा प्रकल्पात तयार झाली. येथे ऑडी -३ सह ऑडी ए ४, ए ६, क्यू ५ या कार बनतात.

"लो कॉस्ट' कारची गरज भागवणार
फोक्सवॅगन समूहासाठी भारत ही अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे मेयर यांनी सांगितले. ते म्हणाले, विकसित तसेच विकसनशील देशांतील किफायतशीर कारची गरज भागवण्यासाठी भारत हे उत्तम केंद्र आहे. त्या दृष्टीने कंपनीने दोन वर्षांची योजना आखली आहे. त्यानुसार शेंद्रा प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...