आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातून 1.9 लाख कार रिकॉल करणार फॉक्सवॅगन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जर्मन कार कंपनी 'फॉक्सवॅगन'ने भारतात विकलेल्या लक्षावधी गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया जुलैमध्ये सुरु होईल. कंपनीने भारतातून 1.9 लाख गाड्या परत मागवल्या आहेत. या प्रक्रियेला 'व्हॉलंटरी रिकॉल' असे संबोधले आहे.

फॉक्सवॅगन अमेरिका, यूरोप व जगभरातील अनेक देशांमधून आपल्या गाड्या परत बोलवत आहे. कंपनीने दिलेली माहिती अशी की, गाड्यांमध्ये नवे अॅमीशन (उत्सर्जन अथवा धुर नियंत्रित करणारे सॉफ्टवेअर) बसवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फोक्सवॅगन भारतीय बाजाराशी पूर्णपणे एकनिष्‍ठ असल्‍याने त्‍यांच्‍या भविष्‍यातील गुंतवणूकीसंदर्भातील योजना आणि लॉंचिंगवर कोणताही विपरीत परिणाम पडणार नाही.
फोक्सवॅगनने भारतात चांगली गुंतवणूक केली आहे. 2007 मध्ये स्‍थापना झाल्‍यापासून कंपनीने एकूण 5720 कोटींची गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षांत, कंपनीने डबल डिजीट ग्रोथ केली असून, चालू कॅलेंडर वर्षात 15 टक्‍के ग्रोथ नोंदवण्‍यासाठी कंपनी सरसावली आहे. या प्‍लांटमधून भारतीय बाजारपेठेसाठीच नव्‍हे तर, 35 देशात माल पुरवला जातो. उत्‍पादनाची वाढती मागणी लक्षात घेता ती पूर्ण करण्‍यासाठी अलिकडेच तिसरी शिफ्ट सुरू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. ही बाबही अत्‍यंत महत्‍त्वाची आहे. या गुंतवणूकीसह भारतात कंपनीचा प्रेजेंस वाढवण्‍यावर भर दिला जाणार आहे. फोक्‍सवॅगन भारताशी बांधील राहिल.
बातम्या आणखी आहेत...