आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कॉमर्स क्षेत्रात 1 लाख नोकऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात इंटरनेटची पोहोच शहरी क्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रातही झाल्याने ई-कॉमर्स उद्योगाचा फायदा झाला आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. हेच कारण आहे की हा उद्योग सातत्याने विकास करत आहे. एका अहवालानुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत ई-कॉमर्स उद्योगात ७५ हजारांपासून ते एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळतात. यात लाॅजिस्टिक्सला समाविष्ट केले गेलेले नाही. यातील अधिकांश नोकऱ्या सेल्स आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात आहेत. वर्तमानात जवळपास ५ लाख लोक ई-कॉमर्समध्ये काम करत आहेत. 
 
दोन वर्षांत ऑनलाइन रिटेलमध्ये ५७ टक्क्यांची वाढ 
देशात ई-कॉमर्स बिझनेस टू बिझनेस बाजार २०२० पर्यंत ७०० अब्ज डॉलर आणि बिझनेस टु ग्राहक बाजार १०२ अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्सचा व्यवसाय-बिझनेस टू ग्राहक उद्योग ३४ टक्के वार्षिक दराने वाढत आहे. तेच देशात ऑनलाइन खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या ४१ टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि २०२० पर्यंत याची संख्या २२ कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. 
 
इंटरनेट अॅण्ड मोबाईल असोसिएशनचा अहवाल 
अशातच इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशातील डिजिटल कॉमर्स उद्योग २०११ ते २०१५ च्या दरम्यान ३० टक्के या वार्षिक दराने वाढली आहे. तेच डिसेंबर, २०१४ नंतर २०१६ च्या शेवटापर्यंत ऑनलाइन रिटेल बाजारात ५७ टक्क्यांची वाढ पाहावयास मिळाली आहे. देशातील एकूण ई-रिटेल बाजारात फक्त इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आणि फॅशनची ४९ टक्के भागीदारी आहे. याच्या विस्ताराने ई-कॉमर्स उद्योगात रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. 
 
विक्री-विपणन क्षेत्रातही विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी 
अहवालानुसार ई-कॉमर्सच्या क्षेत्रात यावर्षी अधिकांश नोकऱ्या विक्री आणि विपणनच्या क्षेत्रात मिळण्याची शक्यता आहे. यात डिजिटल मार्केटिंगही समाविष्ट आहे. याशिवाय व्यवसाय विश्लेषण, उत्पादन विकसन, वित्तपुरवठा आणि कंटेंट व्यवस्थापनासारख्या व्यावसायिकांचीही मागणी वाढेल. प्रभावी विपणन कोणत्याही उत्पादनाला लोकप्रिय बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावते. विपणन अनेक प्रकारच्या असतात. ज्यात विपणन संशोधन, ब्रँड व्यवस्थापन, जाहिरातबाजी, प्रमोशन, विक्री, जनसंपर्क, पुनर्संपर्क, इव्हेंट व्यवस्थापन आणि डिजिटल मीडिया सहभागी आहेत. 

काही नवे करण्याची क्षमता, डिझाइन आणि कंटेंटमध्ये नवेपण मार्केटिंग कॅम्पेनला वेगळ्या पातळीवर घेऊन जातात. मार्केटिंग (विपणन) मध्ये करिअर चांगला पर्याय असू शकतो. तथापि, वेळोवेळी अधिक दबावात उत्तम सादरीकरण करण्याची गरज असते. याचा पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना वेळोवेळी आयुष्यभर फायदा होतो.

व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संधी  
पदवी केलेले विद्यार्थी एमबीए कोर्समध्ये प्रवेश घेऊन मार्केटिंग आणी सेल्सच्या क्षेत्रात करिअर बनवू शकतात. मोठ्या मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश कॅट, गेट, मॅट, सीमॅटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील व्हॅलिड गुणावर मिळतो. काही संस्था स्वत:ची प्रवेश चाचणीही आयोजित करतात. याशिवाय विद्यार्थी पदविका कोर्समध्येही प्रवेश घेऊ शकतात. कंटेंट मॅनेजर बनण्यासाठी विद्यार्थी मास कम्युनिकेशनमधील बॅचलर कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. कोणत्याही शाखेतून १२ वी करणारा विद्यार्थी यास प्रवेश घेऊ शकतो. 
 
ई-कॉमर्स आणि रिटेलिंग वेबसाइटमध्ये जॉबच्या संधी 
या क्षेत्रात व्यवसाय बडी ई-कॉमर्स, ऑनलाइन रिटेलिंग वेबसाइट, ऑनलाइन अॅडव्हर्टायझिंग फर्ममध्ये जॉब करू शकतात. या क्षेत्रात करिअरची  अधिकांश शक्यता खासगी क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. सरकारी नोकऱ्यांच्या संधी कमी आहेत. याशिवाय विपणन आणि विक्री व्यावसायिकांसाठी अनेय क्षेत्रांतही जॉबच्या संधी आहेत. 
 
१५ ते २० हजार रुपये प्रतिमाह मिळू शकते प्रारंभिक पॅकेज  
या क्षेत्रात फ्रेशरला सरासरी १५ ते २० हजार रुपये प्रतिमहाचे पॅकेज मिळण्याची शक्यता असते. काही वर्षांच्या अनुभवानंतर हे पॅकेज ३५ ते ४५ हजार रुपये प्रतिमहापर्यंत असू शकते. मार्केटिंग हेडसारख्या वरच्या पदांसाठी वार्षिक सॅलरी पॅकेज ८ ते १० लाख रुपयांपर्यंतचे असू शकते. 
बातम्या आणखी आहेत...