आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात ५८.४ % संपत्ती १ % श्रीमंत लोकांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - असमानतेबाबत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. येथील एकूण संपत्तीतील ५८.४ टक्के हिस्सा फक्त एक टक्का लोकांकडे आहे. याबाबत रशिया प्रथम क्रमांकावर आहे. तेथील ७४.५ टक्के वेल्थ फक्त एक टक्का लोकांकडे आहे. थायलंडमध्ये हा आकडा ५८ टक्के, ब्राझीलमध्ये ४७.९ टक्के आणि चीनमध्ये ४३.८ टक्के आहे. क्रेडिट सुइस संशोधन संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वेल्थ अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.
या अहवालानुसार असमानतेची ही समस्या जगातील प्रत्येेक कानाकोपऱ्यात आहे. प्रतिव्यक्ती संपत्तीबाबत स्वित्झर्लंड जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. चीन आणि भारत लोकसंख्या आणि विकासाच्या दृष्टीने एकसारखे असले तरी या दोन्ही देशांतील मालमत्तेचे वितरण खूपच वेगवेगळे आहे. सर्वात खाली असलेल्या २० टक्के लोकांमध्ये ३१ टक्के भारतीय तसेच चीनमध्ये फक्त ७ टक्के लोक आहेत.
बातम्या आणखी आहेत...